नूतनच्या विद्यार्थ्यांना नोव्हिटू सॉफ्टलॅब तर्फे इंटर्नशिप

तळेगाव दाभाडे – येथील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट तसेच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक आणि आयटी शाखेतील 27 विद्यार्थ्यांना “नोव्हिटू सॉफ्टलॅब’ (एनएसएल) या आयटी कंपनी तर्फे प्रत्यक्ष काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे. मध्यम उद्योग, तसेच उत्पादन क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या यासाठीचे इंटरनेट ऑफ थिंग्ज, सीआरएम, पेरोल सिस्टिम आदी व्यवस्थांसाठी ईआरपी संगणक प्रणालीच्या माध्यमातून काम करण्याची ही संधी मिळणार आहे, अशी माहिती एनएसएलचे व्यवस्थापकीय संचालक मनोज चौधरी यांनी दिली.

ग्राहकांच्या गरजा समजावून घेऊन त्यासाठीची तंत्र प्रणाली विकसित करण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थी सहभागी होतील. त्यासोबतच तज्ज्ञांचे मार्गदर्शन देखील त्यांना मिळणार आहे, अशी माहिती नूतन अभियांत्रिकीचे संगणक विभाग प्रमुख प्रा. श्‍यामसुंदर इंगळे यांनी दिली. विद्यार्थ्यांसोबतच प्राध्यापक देखील या इंटर्नशिपमध्ये सहभागी होणार आहेत, असे प्राचार्य डॉ. राजेंद्र कानफाडे स्पष्ट केले.

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठीत शिक्षण देण्याच्या सर्व संधी अशा पद्धतीच्या इंटर्नशिपद्वारे शक्‍य होत असल्याने सर्वच शाखांच्या विद्यार्थ्यांना अशी संधी उपलब्ध केली जात आहे, असे मत संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी व्यक्‍त केले. संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, उपाध्यक्ष संजय (बाळा) भेगडे, सचिव संतोष खांडगे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)