नुसरत भरुचाने केले ऋषभ पंतचे कौतुक

बॉलिवूड आणि क्रिकेटमधील नाते तसे खूप जुने आहे. या दोन्ही क्षेत्रांना जेवढे ग्लॅमर आहे, तितके अन्य कोणत्याही क्षेत्रांना मिळाले नसेल. या दोन्ही क्षेत्रांमधून अनेक जोड्या जमल्या आहेत. त्यामुळेच जर एखाद्या ऍक्‍ट्रेसने क्रिकेटपटूचे कौतुक केले की लगेच गॉसिप फॅक्‍टरी सुरू होते. सध्या सुरू असलेल्या “आयपीएल’मध्ये दिल्ली डेअरडेव्हीलचा धडाकेबाज बॅट्‌समॅन ऋषभ पंतही लवकरच अफेअर गॉसिपमध्ये चिन्हे आहेत. कारण ऍक्‍ट्रेस नुसरत भरुचाने ऋषभच्या बॅटिंग स्कीलचे तुफान कौतुक केले आहे. “63 चेंडूंमध्ये 128 रन्स, ऋषभ पंत शानदार खेळ केला. मजा आली. केवळ ऋषभच्या बॅटिंगचा परफॉर्मन्स बघण्यासाठी मी हायलाईट्‌स पुन्हा बघितल्या.’ असे तिने आपल्या ट्‌विटर अकाउंटवर म्हटले आहे. नुसरतच्या ट्‌विटला ऋषभ पंतने उत्तरही दिले आहे. त्याने बाकी काही नाही, पण एक “स्मायली इमोजी’बरोबर थॅंक्‍स म्हटले आहे.

आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सने ऋषभ पंतने ऑरेंज कॅप दीर्घकाळासाठी आपल्या ताब्यात ठेवली होती. त्याची कामगिरी निश्‍चितच कौतुकास्पद आहे. या परफॉर्मन्सच्या जोरावर तो इंडियन क्रिकेट टीममध्येही निवडला जाऊ शकतो. म्हणूनच नुसरत भरुचाने ऋषभ पंतवर स्तुतिसुमने उधळली आहेत. नुसरत भरुचा अद्याप लीडींग ऍक्‍ट्रेस झालेली नाही. मात्र प्रसिद्धी कोणाला नको असते. प्रसिद्धी मिळवण्यासाठी अफेअर असणे किंवा तसे भासवणे हा एक मिडीया मंत्रा आहे. तसेही असेल कदाचित. नुसरतने 2010 मध्ये “लव्ह सेक्‍स और धोखा’मधून पदार्पण केले होते. मात्र तिची खरी ओळख निर्माण झाली ती “प्यार का पंचनामा’मधूनच. तिच्या “सोनू के टिटू की स्वीटी’ या रोमॅंटिक कॉंएडी फिल्म्चा डायरेक्‍टर लव रंजनबरोबर तिचे अफेअर सुरू असल्याचेही समजले होते. लव रंजन नुसरतपेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे. मात्र बॉलिवूडमध्ये काहीही चालते. यापूर्वी नुसरत आणि लव रंजननी “आकाश वाणी’ आणि “प्यार का पंचनामा 2’साठीही एकत्र काम केले होते. त्यांच्या रिलेशनशीपला आता कुठे सुरुवात होते आहे. त्यामुळे आताच काही निश्‍चित सांगता येणार नाही. मग ऋषभ पंतचे काय होणार ?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)