लोणावळा – काश्मीर राज्याची मुलगी आणि महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ म्हणून जगप्रसिद्ध असणाऱ्या लोणावळा शहराच्या सुनबाई असलेल्या परवीन शेख या मिसेस इंडिया इंटरनॅशनल 2018 च्या अंतिम फेरीत दाखल झाल्या आहेत.
मलेशियात 25 एप्रिल रोजी होणाऱ्या मिसेस इंडिया इंटरनॅशनल 2018 च्या अंतिम फेरीत नुसरत यांचा सहभाग निश्चित झाला असूनख तत्पूर्वी त्या 23 एप्रिल रोजी गोवा येथे होणाऱ्या प्रमोशनल शूटमध्ये सहभागी होणार आहे. नुसरत यांना तीन अपत्य आहे. त्यांनी जे यश संपादन केले आहे ते यश काश्मीर तसेच महाराष्ट्रातील घराच्या घरगाड्यात अडकून पडलेल्या विवाहित महिलांपुढे आपणही यशाची शिखर काबीज करू शकतो असा एक आदर्श निर्माण करून देणारं आहे.
नुसरत यांच्या या यशाबद्दल सर्व लोणावळा शहरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्थानिक नगरसेविका गौरी मावकर तसेच अन्य महिलांनी नुसरत यांचा घरी जाऊन त्यांचा सत्कार केला तसेच स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा