नुवान झोयसा आयसीसीकडून निलंबित 

कोलंबो: श्रीलंका क्रिकेट संघाचे सध्याचे गोलंदाजी प्रशिक्षक आणि माजी जलदगती गोलंदाज नुवान झोयसा यांना सामना निकाल निश्‍चीती प्रकरणावरुन निलंबन करण्यात आले आहे. त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मॅच-फिक्‍सिंग आणि गैरव्यवहार केल्याचे आरोप ठेवले असून, त्यांना निलंबित करण्यात आले आहे. आयसीसीने ही माहिती एका पत्रकाद्वारे दिली आहे.

आरोपांवर उत्तर देण्यासाठी झोयसा यांना 1 नोव्हेंबर 2018 पासून 14 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. झोयसा यांच्यावर सामन्याच्या निकालावर प्रभाव टाकणे, खेळाडूंना आयसीसीच्या भ्रष्टाचार नियमांचे उल्लंघन करण्यासाठी उकसवणे, आणि लाचलुचपत प्रतिबंधक समितीला खरे उत्तर न देता दिशाभूल करणे असे तीन गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यापूर्वी, श्रीलंकेचा माजी धडाकेबाज सलामीवीर सनथ जयसूर्यावरही आयसीसीने भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत. आयसीसीच्या 2.4.6 या कलमानुसार जयसूर्यावर भ्रष्टाचारविरोधी पथकाला मदत न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचबरोबर कलम 2.4.7 नुसार कारवाईमध्ये बाधा आणण्याचा आरोपही करण्यात आला आहे. माजी डावखुरे वेगवान गोलंदाज झोयसाने 30 कसोटी आणि 95 एकदिवसीय सामन्यांमध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले आहे. सप्टेंबर 2015 मध्ये त्याच्याकडे गोलंदाजीचे प्रशिक्षकपद सोपवण्यात आले होते.

नुवान झोयसा याच्यावर त्वरित आणि तात्पुरत्या स्वरूपाची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 1 नोव्हेंबरपासून झोयसा यांना आपल्यावरील आरोपांबाबत उत्तर देण्यासाठी 14 दिवसांची मुदत देण्यात आली आहे या दरम्यान जर त्यांनी आपल्यावरिल आरोपांबाबत उत्तर दिले तर या कार्यवाहीचा पुनर्विचार होण्याची शक्‍याता आहे.

– आयसीसी

https://twitter.com/ICC/status/1057618512947150848

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)