नुपूरनाद महोत्सव रंगणार 3 फेब्रुवारी रोजी

संग्रहित छायाचित्र

नृत्यांगना अलारमेल वल्ली यांचे भरतनाट्यम सादरीकरण

पुणे – भैरवी संगीत प्रसारक मंडळ पुणे तर्फे दिनांक 3 व 4 फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय नुपूरनाद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवामध्ये प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना पद्मभूषण विदुषी अलारमेल वल्ली यांचे अनेक वर्षांनंतर पुण्यात सादरीकरण होणार आहे.

पंडित जयतीर्थ मेवुंडी व पंडित प्रवीण गोडखिंडी यांची गायन व बासरीची जुगलबंदी ऐकण्याची मेजवाणी पुणेकर रसिकांना मिळणार आहे, अशी माहिती भैरवी संगीत प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. धनंजय दैठणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कार्यवाह डॉ. स्वाती दैठणकर, नृपूर दैठणकर व कॉटनकिंगचे संचालक कौशिक मराठे आदी उपस्थित होते. कोथरुडमधील आयडियल कॉलनीत असलेल्या मैदानावर सायंकाळी 6 वाजता या महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. नूपुरनाद महोत्सवाचे यंदा दुसरे वर्ष आहे. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असणार आहे. डॉ. धनंजय दैठणकर म्हणाले, अलारमेल वल्ली यांच्या सादरीकरणाने शनिवारी 3 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता या महोत्सव सुरू होणार आहे.

-Ads-

उद्‌घाटन समारंभावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहळ, कॉटनकिंगचे प्रदीप मराठे आदी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पंडित जयतीर्थ मेवुंडी व पंडित प्रवीण गोडखिंडी यांची गायन व बासरीची जुगलबंदी रंगणार आहे. तबल्यावर चारुदत्त फडके, तर हार्मोनियमवर राहुल गोळे साथ करणार आहेत. रविवारी 4 फेब्रुवारीला पंडित राहुल शर्मा यांचे संतूरवादन होणार असून, त्यांना सत्यजित तळवलकर तबल्यावर साथ करणार आहेत. त्यानंतर पंडित व्यंकटेश कुमार यांचे गायन होणार आहे. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव, तर हार्मोनियमवर राहुल गोळे साथ करणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)