नीलेश लंकेंची जबाबदारी माझी : जयंत पाटील

पारनेर: “अजित पवार यांच्याशी सल्लामसलत करून तुम्ही या पक्षात आला आहात. त्यामुळे तुमची सर्व जबाबदारी मी आणि अजित पवार यांनी घेतली आहे. मतदार संघात अनेक गट आहेत. त्या सर्वाना आपण एक करू. सभेसाठी जमलेला जनसमुदायाने विश्‍वास दिला आहे की, पुढील येथे आमदार राष्ट्रवादीचाच असेल,’ असा विश्‍वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची राज्यात निर्धार परिवर्तन यात्रा सुरू आहे. पारनेर येथे यानिमित्ताने सभा झाली. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नीलेश लंके यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधानसभा माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, रोहित पावर, माजी मंत्री मधुकर पिचड, अंकुश काकडे, आमदार राहुल जगताप, आमदार वैभव पिचड व जिल्हाअध्यक्ष राजेंद्र फाळके उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंडे म्हणाले, “भारतीय जनता पक्षा आणि शिवसेनेचे बांडगूळ 2014ला म्हणत होते, महागाई आहे, मग आता काय आहे? गेल्या लोकसभेला तरुण म्हणायचे “हर हर मोदी, घर घर मोदी’. याच तरुणांना मोदी यांनी बेरोजगार केले आहे. दोन कोटी नोकऱ्या देऊ, असे सांगून फसविले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. त्यांना देखील भाजपने फसविले आहे. पंतप्रधानाची अवस्था गजनी चित्रपटाप्रमाणे झाली आहे, आता त्यांना काही आठवत नाही.’

लंके यांनी मी चामड्याची चपल करून घातली तरी जनतेचे उपकार फिटनार नाही. त्यांनी आपला अपमान केला आहे. त्यांना घरी बसवायचे आहे. पारनेरमध्ये पाणी हे राष्ट्रवादी पक्षच आणू शकते. अजित पवार यांनी तसा माल शब्द दिला आहे. शेतकऱ्याचा प्रश्‍न फक्त राष्ट्रवादीलाच माहित असल्याचेही ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अशोक सावंत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मधुकरराव उचाळे, महानगर बॅंकेचे अध्यक्ष उदय शेळके, बाजार समिती सभापती प्रशांत गायकवाड, पंचायत समिती उपसभापती दीपक पवार, साबाजी गायकवाड, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बाबासाहेब तरटे, माजी पंचायत समिति सदस्य शंकर नगरे, युवक तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, जिल्हा सरचिटणीस अशोक घुले, राजेंद्र चौधरी, सुदाम पवार, संदीप मगर, सुरेश धूरपदे उपस्थित होते.


आमदार औटी यांना मुंडेंचा इशारा

“पारनेर तालुक्‍याला पाणी देण्याचा शब्द अजित पवार यांनी दिला आहे. हा शब्द म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचा शब्द आहे. या शब्दात बदल होणार नाही. सभेला येण्याअगोदर मला सांगण्यात आलं आहे की, येथील आमदारांची तालुक्‍यात खूप दहशत आहे. दहशत करणाऱ्यांनी यापुढे राष्ट्रवादीच्या नादी लागू नये,’ असा इशारा धनजंय मुंडे यांनी यावेळी दिला. एवढी गर्दी बघितल्यानंतर कोणाची काय दहशत, राहील असंही विजय औटी यांचे नाव न घेता मुंडे यांनी टोला मारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)