नीर नदी दुथडी

निमसाखर- सध्या भाटघर, नीरा देवघर धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने धरणे तुडुंब भरली आहेत. त्यामुळे या दोन्ही धरणातून नीरा नदीत पाणी सोडण्यात येत असल्याने वीर धरणही “फुल्ल’ झाले आहे. त्यामुळे या धरणातूनही नीरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. त्यामुळे नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील बांगर्डे व पुणे जिल्ह्यातील निमसाखर या गावांना जोडण्यासाठी या ठिकाणी पूल नसल्याने नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
निमसाखर हे मोठी लोकसंख्या असलेले गाव असून या गावापासून एक किलोमिटर अंतरावर बांगार्डे (ता. माळशिरस, जि. सोलापूर) गाव आहे. या ठिकाणी बऱ्याच सोयी सुविधांचा अभाव असल्यामुळे दळवळणाचे गाव म्हणून निमसाखरकडे पाहिले जाते. निमसाखर गावामध्ये अंगणवाडी, पहिली पासून ते बारावी पर्यंत शिक्षण मिळते त्यामुळे बांगार्डे गावातून या शिक्षण संकुलामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी येत असतात. मात्र, या दोन गावांमध्ये नीरा नदीचे पात्र आहे मात्र जवळचे जरी अंतर असले तरी पावसाळ्यात नागरिक व विद्यार्थ्यांचे मोठे हाल होतात. पावसाळ्यात नदीत जादा वाहते पाणी असल्यास या ठिकाणी सुरक्षेतेच्या दृष्टीकोनातून होडी चालक होडी सोडत नाहीत. स्थिर पाण्यात होडीच्या माध्यमातून या गावातील नागरीक व विद्यार्थी ये-जा करीत असतात. मात्र, सध्या होड्या ही बंद असल्याने शिक्षणासाठी बांगर्डे व चव्हाणवाडी परिसरातून निमसाखर, कळंब, वालचंदनगर, बारामती या भागात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर नागरिकांना ही अशाच प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे निमसाखर, निरवांगी, घोरपडवाडीसह इंदापूर तालुक्‍यातील नागरिकांना ही नातेपुते, सदाशिवनगर, माळशिरस भागात जाण्यासाठी हा अत्यंत जवळचा मार्ग आहे. यामुळे निमसाखर-बांगार्डे दरम्यान पूल झाल्यास दोन जिल्ह्यांना जोडणारा मोठा दुवा निर्माण होऊन दळण-वळणात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

  • फक्‍त फाईलींवर फाईली आल्या…
    गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पुलाची मागणी आहे. दोन जिल्ह्यांना जोडणारा पूल याठिकाणी करण्यात येइल या आशेवर दोन पिढ्या गेल्या मात्र, अद्यापही या ठिकाणच्या समस्या सुटल्याच नाही. या पुलासाठी अनेक वर्षांपासून बांगार्डेकरांनी अनेक पुढाऱ्यांचे उबरठे झिजवले. फाईलींवर फाईली झाल्या, खर्च झाला. याचबरोबर अधिकारी आमदार, खासदार असो की मंत्री-संत्री सगळ्यांना हात जोडुन झाले विनंती झाल्या अन्‌ लाला, हिरव्या रंगबेरंगी सह्या, चिठ्ठ्या चपाट्या झाल्या. मात्र, आज तागायत पुलासाठी पाहणी सुद्धा झाली नसल्याची चर्चा आहे.
    नीरा नदी : निमसाखर येथे दुथडी भरून वाहणारे नदीचेपात्र.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)