कराटे स्पर्धेत सृष्टी, गणेश प्रथम

सोमेश्‍वरनगर – येथे झालेल्या ज्युदो कराटे किक बॉक्‍सिंग मार्शल आर्ट कराटे स्पर्धेत सृष्टी गाडे व गणेश नलवडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत सोमेश्‍वरनगर, वाघळवाडी, वाणेवाडी, मुरूम, वडगाव येथील मुलामुलींनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्‌घाटन संस्थेचे चिफ मास्टर धनंजय भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संदीप कदम, लक्ष्मण दीक्षित, मनोज बोबडे उपस्थित होते. यलो बेल्टमध्ये सृष्टी गाडे, प्रगती गाडे, ऋचा कदम, गणेश नलवडे, वरद निंबाळकर, यश बुनगे, ऑरेंज बेल्टमध्ये समृद्धी ननवरे, वैष्णवी जाधव, भक्‍ती दीक्षित, सोमनाथ घोरपडे, शुभम कांबळे, श्रेयश वाईकर, ग्रीन बेल्टमध्ये दिव्या मैड, तन्वी जगदाळे, प्राजक्‍ता मैड, ब्लू बेल्टमध्ये आदित्य बोबडे, जयदीप कुलकर्णी, ऋषीकेश गवळी यांनी क्रमांक मिळविला. ग्रॅंड मास्टर प्रकाश रासकर, गणेश गिरी, प्रवीण वैरागे, निकीता सुतार, अविनाश मांढरे, यशराज जगताप आदींनी संयोजन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून गौरवण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)