नीरेत महावीर जयंती उत्साहात साजरी

नीरा- नीरा (ता. पुरंदर) येथे विश्वधर्म जैनधर्मियांचे वर्तमान शासक श्री 1008 भगवान महावीर यांची 2616 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महावीर जयंतीनिमित्त मंदिरामध्ये अध्यक्ष सुरेश शहा व अनघा शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पालखीमध्ये उत्सवमूर्ती आणि जीनवाणी विराजमान करून पालखीची सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. पालखीमागे जोडीने कुंभ घेऊन फिरण्याचा मान चकोर शहा व नुतन शहा यांना मिळाला तर, रथात बसण्याचा मान विनिता शहा व रूपाली शहा यांना मिळाला. मिरवणुक मंदिरात आल्यानंतर सर्व श्रावक, श्राविकांनी नृत्यातून भक्ती केली. त्यानंतर चढावे आणि भगवंताचा पंचामृत, अभिषेक सोहळा पार पडला.

महावीर भगवानांची माता त्रिशलाराणीचा मान वृषाली शहा, स्मिता उपाध्ये, प्रतिभा काळदाते यांना मिळाला. सायंकाळी भगवंताचे नामकरण,सांस्कृतीक कार्यक्रम, भजन, आरतीने महावीर जयंतीची सांगता करण्यात आली. यावेळी विश्वस्त मनोज शहा, पद्मराज कोठडिया, राजेंद्र जैन, सनी शहा, रेणुका कोठडिया, शैला शहा यांच्यासह सर्व जैन बांधव उपस्थित होते. दरम्यान नीरा येथे रविवारी (दि. 1) एप्रिल रोजी पाच जिल्ह्याच्या सामुहिक महावीर जन्मकल्याणक प्रभावना महोत्सव संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास सर्व जैन बांधवांनी उपस्थित राहण्याचे अवाहन सकल जैन समाज, नीरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)