नीरेतील यश एज्युकेशन सोसायटीचा गौरव

नीरा-प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास योजनेच्या अंतर्गत उत्कृष्ट प्रशिक्षण व रोजगारासंदर्भात कार्य केल्याने नीरा (ता. पुरंदर) येथील यश एज्युकेशन सोसायटीला पुणे येथील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने सन्मानित करण्यात आले. सोसायटीकडून गेल्या वर्षी परिसरातील सुमारे 240 सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले. यातील सुमारे 50 टक्के विद्यार्थ्यांना रोजगाराच्या वाटा सापडल्या. या कार्यामुळे जागतिक युवा कौशल्य दिना निमित्त संस्थेला सन्मानित केल्याचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश जगदाळे यांनी सांगितले. यावेळी विभागीय उपसंचालक श. बा. आंगणे, येरवडा कारागृहाचे अधीक्षक पवार, जिल्हा माहिती अधिकारी सनक, जिल्हा कौशल्य मार्गदर्शन अधिकारी बी. व्ही. कानिटकर व इनुजा शेख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)