नीरेतील नागरिकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

ज्युबिलंट कंपनी विरोधात नागरिकांनी अनेक आंदोलने केली आहेत. मात्र, प्रत्येक वेळी आमच्याकडे असे काही होत नसल्याचा कांगावा कंपनी करते. उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाई नंतरही बंदी असलेल्या रसायनांचे उत्पादन कंपनीत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रसायन उत्पादन करणारी ही कंपनी विशेष औद्योगिक विभागात न्यावी.
– अमोल साबळे, तक्रारदार नागरिक, नीरा

घातक रसायनांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीवर कारवाईची मागणी

नीरा – उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून बंदी असलेल्या रसायनांचे उत्पादन घेणाऱ्या नीरा येथील ज्युबिलंट लाईफ सायन्सेस कंपनीच्या कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर करवाई करावी. नागरी वस्तीजवळ प्राणघातक रसायने उत्पादित करण्यास मदत करणाऱ्यांचाही आम्ही निषेध करतो, अशा आशयाचे व या प्रकरणातील चौकशी करण्याची मागणी करण्याचे पत्र नीरेतील नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फाडणवीस यांना पाठवले आहे. गृहखाते व त्या अंतर्गत येणारे उत्पादन शुल्क खाते मुख्यमंत्री फडणवीस यांच्याच अखत्यारीत असल्याने त्यांनी या प्रकरणी लक्ष घालुन कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

नीरा (ता. पुरंदर) गावच्या शिवेलगत असलेल्या ज्युबिलंट लाईफ सायन्सेस या खासगी कंपनीवर मार्च महिन्याच्या सुरवातीला उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून चार दिवसांसाठी कंपनीतील काही प्लांट सिल केले होते. यानंतर गृह विभागाने हे प्लांट सुरू केले असले तरी बंदी असलेली उत्पादने सोडून इतर उत्पादने घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र, यानंतरही नीरा शहरात नागरिकांत आरोग्यच्या प्रश्‍नावर भीती निर्माण झाली आहे. यामुळे याभागात राहणाऱ्या नागरिकांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे.

याबाबतचे निवेदन आज नीरा येथील पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. तसेच आपले सरकार या तक्रार निवारण पोर्टलवर देखील यासंदर्भात तक्रार करण्यात आली आहे. कंपनी स्वतःच्या फायद्यासाठी बंदी असलेल्या रसायनांचे उत्पादन घेते. नागरिकांच्या आरोग्याचा विचार कोणी करीत नाही. वायु गळित सारखे प्रकार झाल्यास भविष्यात एखादा मोठा अपघात घडल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे या कंपनीतील घातक रसायानांचे उत्पादन बंद करावे, अन्यथा ही कंपनी विशेष औद्योगिक विभागात हलविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)