नीरा शिवतक्रार ग्रामपंचायतीत गैरव्यवहार?

  • गाळ्याचे बेकायदा हस्तांतरणाचा उपसरपंच भोसले यांचा आरोप

नीरा – नीरा शिवतक्रार ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी बेकायदेशीर व्यवहार करून ग्रामपंचायतीच्या मालकीचा गाळा दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करीत गैरव्यवहार केला असल्याचा आरोप करीत नीरेचे उपसरपंच बाळासाहेब भोसले यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पुरंदर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे उपसरपंच भोसले यांनी निवेदन दिले आहे. गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी व्हावी, याकरिता उपसरपंच बाळासाहेब भोसले यांच्यासह समर्थकांनी पुरंदर पंचायत समितीसमोर दि. 9 ऑगस्ट रोजी उपोषणही केले होते. त्यावेळी गटविकास अधिकाऱ्याच्या आश्वासनानंतर उपोषण माघारी घेण्यात आले. परंतु, या प्रकरणी अद्यापही कार्यवाही झाली नाही. याच पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायतीच्या गाळ्याचे बेकायदा हस्तांतरण प्रकरण पुढे आले असून उपसरपंच भोसले यांनी चौकशी तसेच संबंधीतांवर कारवाईची मागणी केली असून गाळ्याच्या प्रकरणी येत्या पाच दिवसांत कारवाई करावी अन्यथा नागरिकांसह उपोषणास बसू, असा इशाराही भोसले यांनी दिला आहे.

सदर गाळ्याची नोंद दि. 26 फेब्रुवारी 2018च्या मासिक सभेने मंजूर केल्याप्रमाणे धरण्यात आली आहे. यावेळी झालेल्या मासिक सभेला मी हजार नव्हतो. मी आठवड्यापूर्वीच येथे हजार झालो आहे. ठराव झाला त्या दिवशी माझ्याकडे ग्रामपंचायतीचा चार्ज नव्हता. ठराव पूर्ण असल्याने व त्याला सूचक, अनुमोदक असल्याने ही नोंद धरण्यात आली आहे. येथील कर्मचाऱ्यांनी संगणकीकृत उतारा दिल्याने मी सही केली. मात्र, मी येथे येण्यापूर्वी काय झाले, याबाबत मला अंधारात ठेवण्यात आले.
– सचिन लिंबरकर, ग्रामसेवक, नीरा-शिवतक्रार

मासिक सभेस मी माझ्या वैक्तिक अडचणीमुळे हजर राहू शकले नव्हते. यात कोणते विषय झाले याची मला माहिती नाही. मात्र, क्‍लार्कने प्रोसेडींग लिहिताना आलेल्या अर्जाचा समावेश त्यात केला. यातून हा गोंधळ झाला असल्याचे दिसते. मात्र, केलेली नोंद तातडीने रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
– दिव्या पवार, सरपंच, नीरा-शिवतक्रार


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)