नीरा रेल्वे स्टेशनच्या बाहेर बेशिस्त पार्किंग

नीरा – पुरंदर तालुक्‍यातील नीरा शहराला पार्किंगच्या समस्येने ग्रासले आहे. रेल्वे स्टेशनच्या बाहेर प्रशासनाने पार्किंगसाठी जागा उपलब्ध असतानाही अस्तव्यस्त गाड्या लावल्याने प्रवाशांना चालताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पार्किंगची समस्या सोडविण्याबरोबरच सीसीटीव्ही लावण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

पुण्याचे उपनगर म्हणून नीरा शहराची ओळख होऊ लागली आहे. दररोज सकाळी परिसरातील शेकडो प्रवासी पुणे, मुंबई, सातारा सह अन्य ठिकाणी नोकरी व शिक्षणासाठी रेल्वेने प्रवास करतात. नीरा शहरातील लोक दुचाकी घेऊन रेल्वे स्टेशनला येतात व दिवसभर मोटारसायकल पार्किंगमध्ये लावलेली असते. त्यानंतर संध्याकाळी घेऊन जातात. परंतु येथे कोणतीही सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली नाही.

रेल्वे प्रशासनाने फक्त पार्किंगसाठी जागा निर्माण केली आहे. परंतु, तेथे सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांना आपले वाहन रामभरोसे सोडून कामावर जावे लागत आहे. नियमित प्रवासी त्यांच्या मोटारसायकली रांगेत व्यवस्थीत लावतात. पण थोड्या वेळासाठी किंवा प्रवाशांना सोडण्यासाठी आलेले नातेवाईक अस्तव्यस्त गाड्या लावत असल्यामुळे गाड्या काढताना कुरबुरी नित्याच्या झाल्या आहेत. नीरा शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातून लोक वेगवेगळ्या कामांसाठी येत असतात. खाजगी रुग्णालय, बॅंक, पतसंस्थानसह व्यावसायिकांच्या दारासमोर वाहने चुकीच्या पद्धतीने पार्क केलेली असतात. त्यामुळे शहरात वाहतुकीची समस्या गंभीर बनत चालली आहे.

नागरिकांनी केली कारवाईचा मागणी
केवळ आठवडा बाजारात वाहन चालकांवर कारवाई करत संबंधितांकडून दंड वसूल करण्यापेक्षा वाहन चालकांना शिस्त लावण्याची गरज आहे. धनदांडग्यांच्या गाड्यांवर कारवाई होत नसल्याने पार्किंगची समस्या गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे पोलिसांनी याकडे वेळीच लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)