नीरा येथे स्वच्छता मोहीम

नीरा- पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ जिल्हा पुणे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत नीरा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विद्यार्थ्यांनी नीरा शहरातून प्रभात फेरी काढून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला. यामध्ये शाळा नंबर 1 मधील 2000 विद्यार्थी सहभागी झाले होते.
जिल्हा परिषदेच्या वतीने 1 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान हा उपक्रम राबवण्यात येत आहे. मुलांनी गाडगेबाबांचा एकच मंत्र, स्वच्छतेचे जाणा तंत्र, स्वच्छता आली अंगणात, समाज का अंधारात, स्वच्छता ठेवा आजार पळवा, कचरा करुनी कमी आरोग्याची मिळेल हमी आदी घोषणा देण्यात आल्या. मुलांनी हातामध्ये स्वच्छतेचे संदेश असलेले फलक घेऊन प्रभात फेरी काढली. सहशिक्षक सुधाकर देवकर यांनी मुलांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. यावेळी मुख्याध्यापक सुभाष बोरकर समवेत शिक्षक व पालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)