नीरा येथे भरदिवसा घरफोडी

नीरा- नीरा (ता. पुरंदर) येथे भरदिवसा दोन चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाइल चोरुन केले. गुरूवार संध्याकाळी पाचच्या दरम्यान पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील रहदारीच्या रस्त्यावर चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही मध्ये चोर कैद झाले आहेत.
चोरांनी इफान पानसरे (रा. नीरा वार्ड नंबर 1) यांच्या बंद घराचे कुलूप चोरांनी भरदिवसा तोडले. त्यानंतर चोरट्यांनी घरातील चार्जिंगला लावलेला एन्ड्रोयड मोबाइल, कपाटातील सोन्याचे मिनी गंठण, रोख रक्कम असा ऐवज घेऊन पोबारा केला. दोन्ही चोरटे घटनास्थळी जाताना व परत येताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत. दरम्यान रात्री उशीरा जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अंकुश माने यांनी घटनास्थळी भेट दिली.
याविषयी जेजुरीचे पोलीस उपनिरीक्षक अंकुश माने यांनी सांगितले की, चोरांचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहेत. यामुळे याघटनेचा तपास लवकरच लागले. यापुढे अशा घटना होऊ नयेत, म्हणून स्थानिक पोलिसांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी यापुढे अनोळखी व्यक्ती आपल्या परिसरात फिरत असल्यास पोलिसांना तत्काळ कळवावे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)