नीरा मोरगाव रस्त्यावर अपघातात एक ठार

नीरा- नीरा नजीक दगडेवस्ती व कोळेवस्ती दरम्यान दुचाकीला पिकअप टेम्पोने जोरदार ठोकर दिल्याने एका दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा जखमी असुन प्रकृती स्थिर आहे. नीरा मोरगाव रस्त्यावर शुक्रवारी (दि. 23) सकाळी 11 वाजलेच्या दरम्यान झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत स्थानिक रहिवाशांकडून मिळालेली माहिती अशी की, जखमी व मयत मोटार सायकलसह (एमएच 11 एएच 8751) मोरगावच्या दिशेकडून निरेकडे निघाले होते. दगडेवस्ती जवळ मोटरसायकल स्वारासमोर अचानक साप आल्याने त्याने मोटारसायकल थांबली. मात्र त्यांना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप टेम्पोने जोरदार धडक दिली. यामध्ये अंदोरी (ता. खंडाळा) येथील रहिवाशी सुभाष पिराजी जाधव (वय 50) हे जागीच ठार झाले तर, मोटारसायकल चालक संपत सुभाजी कोकरे (वय 45 रा. रुई) हे जखमी झाले असून त्यांना लोणंद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच फौजदार विजय होले, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर,होमगार्ड संतोष वाल्हेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमीला उपचारासाठी पाठवले. त्यामुळे एका व्यक्‍तीचे प्राण वाचवण्यात यश आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)