नीरा-भीमा कारखान्याच्या सभागृहाचे उद्‌घाटन

रेडा- शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याने बांधलेल्या शहाजीराव पाटील सभागृहाचे उद्‌घाटन बुधवारी (दि. 29) कारखान्याचे संस्थापक व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी सत्यनारायण पूजा कारखान्याचे संचालक प्रल्हाद शेंडे व त्यांच्या पत्नी मिनाक्षी शेंडे यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमास पंढरपूर येथील वसंतदादा काळे कारखान्याचे अध्यक्ष कल्याण काळे, कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, विलास वाघमोडे, विकास पाटील, श्रीमंत ढोळे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)