“नीरा-भीमा’च्या रोलरचे पूजन

रेडा- शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या 2018-19 या गळीत हंगामासाठीच्या रोलरचे पूजन शुक्रवारी (दि. 3) कारखान्याचे संस्थापक तथा माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उदयसिंह पाटील, विलास वाघमोडे, विकास पाटील, अनिल पाटील, धनंजय कोरटकर, महादेव घाडगे, रणजित रणवरे, अजिनाथ बोराडे, प्रताप पाटील, प्रल्हाद शेंडे, शंकर घोगरे, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहीते, सतीश अनपट, नामदेव किरकत, चंद्रकांत भोसले, शिवाजी हांगे, शिवाजी शिंदे, कार्यकारी संचालक धिरजकुमार माने आदी मान्यवर उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, नीरा-भीमा कारखान्याचे आगामी गळीत हंगामात 8 लाख मे.टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. कारखान्याकडे गाळपासाठी सुमारे 22 हजार एकर क्षेत्रावरील उसाची उपलब्धता आहे. आगामी गळीत हंगामासाठी कारखान्याच्या सर्व यंत्रणेची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. तसेच आज अखेर कारखान्यामधील सुमारे 60 टक्के काम हे पूर्ण झालेले आहे. आगामी हंगामात आसवाणी प्रकल्पातून 1 कोटी 10 लाख लिटरचे उत्पादक होईल. तसेच राज्य शासन आदेश देईल त्या तारखेस कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी कारखान्याची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे नियोजन झालेले आहे. राज्यातील साखर कारखान्यांचा आगामी गळीत हंगाम हा येत्या 1 ऑक्‍टोबर पासून सुरू होण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)