“नीरा-भीमा’चे साडेपाच लाख टन उसाचे गाळप

रेडा- नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने 2017-18 हंगामात 5 लाख 63 हजार 277 टन उसाचे गाळप केले आहे. तर आसवाणी प्रकल्पातून 63 लाख 13 हजार 202 हजार लिटरचे उत्पादन झालेले आहे. तसेच सहवीज निर्मिती प्रकल्पातून 2 कोटी 80 लाख 5 हजार 012 युनिटची विक्री झाली असून चालु गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पडला, अशी माहिती माजी सहकारमंत्री तथा कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा कारखान्याच्या चालु गळीत हंगामाची यशस्वी सांगता आज (रविवारी) हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, कार्यकारी संचालक धिरजकुमार माने, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांतराव पाटील, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, विकास पाटील, श्रीमंत ढोले, रघुनाथ राऊत, मनोज पाटील, पंडितराव पाटील, महादेव घाडगे, श्रीनिवास कोरटकर उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, देशात आजअखेर 260 लाख मे.टन व महाराष्ट्रात सुमारे 94 लाख मे.टन साखरेचे उत्पादन झालेले आहे. नोव्हेंबर महिन्यात गळीत हंगाम सुरू होताना साखरेचा प्रति क्विंटलला असलेला सुमारे रू.3700 होता. सध्या हा दर 2850 रुपयांपर्यंत आला आहे. तरीही कारखान्याने मार्च महिना हा शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा महिना असल्याने अडचण होऊ नये म्हणून गुरुवार (दि. 15) पर्यंतची ऊस बीले अदा करण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे कामगारांना 15 टक्के वाढ दि. 1 मार्च पासून देण्याचा निर्णय झाला आहे. तसेच ग्रेडेशनचा निर्णय हा महिनाभरात घेतला जाईल, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, या कार्यक्रमामध्ये चालु हंगामात सर्वाधिक ऊस तोडणी व वाहतुकीमध्ये पहिले तीन क्रमांक आलेल्या बैलगाड्या, ट्रॅक्‍टर, ट्रक व बजाट या वाहनधारकांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते स्मतीचिन्हे देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कालिदास आवाड, तर कांतिलाल झगडे यांनी आभार मानले.

  • आगामी हंगामासाठी 22 हजार एकर उसाची नोंद
    आगामी 2018-19 च्या गाळप हंगामासाठी कारखान्यांकडे आजपर्यंत सुमारे 22 हजार एकर उसाची नोंद झाली आहे. त्यामुळे कारखान्यांचे गाळप हे लवकरच म्हणजे दि.1 ऑक्‍टाबरपासून सुरू करावे लागणार आहे. नीरा-भीमा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सुमारे 8 लाख में.टन एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऊस उपलब्ध होणार असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)