“नीरा-भीमा’चे ऊस लागवडीचे धोरण जाहीर

रेडा- शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक व राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 2018-19च्या हंगामातील ऊस लागवडीचे धोरण जाहीर करण्यात आले आहे. या धोरणाचा व उस उत्पादन तंत्राचा अवलंब करून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त क्षेत्रावरती ऊस लागवड करून प्रति एकरी सुमारे 100 टनापर्यंत ऊस उत्पादन घ्यावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार व उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी केले आहे.
लालासाहेब पवार म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी योग्य बेणे निवडर बेणे प्रक्रिया, लागवड पद्धती, रोप लागण पद्धत, रासायनिक खतांच्या मात्रा, ठिबक मधून द्यायवयाची खते, किड व रोगांचे नियंत्रण या प्रमाणे ऊस उत्पादनाचे तंत्र वापरल्यास प्रति एकरी 100 टनापर्यंत उसाचे उत्पादन घेता येईल.
ऊस तोडणीचा कार्यक्रमात ऊस लागवड तारखेच्या व सॅम्पल अहवालानुसार कोसी 671, व्ही.एस.आय.8005 व व्ही.एस.आय.10001 या लवकर पक्व होणाऱ्या व जादा साखर उतारा असणाऱ्या ऊस जातींची प्राधान्याने तोडणी करण्यात येईल. त्यानंतर कारर्‌ 86032 या ऊस जातीची तोडणी करण्यात येईल व त्यानंतर फुले 265 या ऊस जातीची तोडणी ही लागण तारखेच्या व सॅम्पल अहवालानुसार केली जाईल, असे अध्यक्ष लालासाहेब पवार व उपाध्यक्ष कांतालाल झगडे यांनी सांगितले. याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, संचालक उदयसिंह पाटील, विलास वाघमोडे, विकास पाटील, अनिल पाटील, धनंजय कोरटकर, रणजित रणवरे, अजिनाथ बोराडे, प्रताप पाटील, प्रल्हाद शेंडे, शंकर घोगरे, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहीते, सतीश अनपट, नामदेव किरकत, चंद्रकांत भोसले, शिवाजी हांगे, अशोक वणवे, शिवाजी शिंदे उपस्थित होते.
ऊस लागवडीचे धोरण :
आडसाली : (लागवड- 15 जुलै ते 31 जुलै, दिवस 17), फुले 265 – एकूण
होणाऱ्या लागवडीच्या 25 टक्केर (आडसाली लागवड – 15 जुलै ते 31 ऑगस्ट, दिवस 48), कोसी 671, को.86032, व्ही.एस.आय.8005
पूर्व हंगाम : (लागवड 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर, दिवस 91)- कोसी 671, को.86032, व्ही.एस.आय.8005, एम.एस.10001
सुरू : (लागवड – 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी, दिवस 90) – कोसी 671, को. 86032, व्ही.एस.आय.8005, एम.एस.10001
खोडवा : (लागवड- कारखाना सुरू झालेपासून ते बंद होईपर्यंत, वरील सर्व जाती).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)