नीरा प्राथमिक आरोग्य केंद्र आता नवीन जागेत

नीरा- नीरा येथील बहुचर्चित प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पूर्ण झाली असून ग्रामस्थांनी रुग्णांची आडचण बघून उद्घाटनाची औपचारिकता बाजूला ठेवत आरोग्य केंद्राचे कामकाज नवीन इमारतीत सुरू केले आहे.आज (दि. 12) जिल्हा परिषद सदस्य शालिनी पवार आणि पंचायत समिती सदस्य गोरख माने यांनी या इमारतीला भेट देऊन आरोग्य केंद्राची पाहणी केली.
जिल्हा परिषद सदस्य शालिनी पवार यांनीयावेळी रुग्णांशी संवाद साधत विचारपूस केली. त्याचबरोबर येथील विविध वैद्यकीय सुविधा आणि औषधसाठ्याची देखील पाहणी केली. नीरेसारख्या सुमारे 20 हजार लोकसंख्या असणाऱ्या गावाला प्राथमिक आरोग्य केंद्राची आवश्‍यकता होती. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य रेखा चव्हाण आणि नंतर विराज काकडे यांच्या प्रयत्नातून ही इमारत साकारली आहे. या आरोग्य केंद्रासाठी 2 कोटी 16 लक्ष रुपये खर्च आला असून, प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सर्व सोयींनी युक्त सुसज्य इमारत बांधण्यात अली आहे. उद्घाटनाची औपचारिकता बाजूला ठेवत येथील ग्रामस्थांनी हे प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारतीत सुरू केले असून पुढील दोन महिन्यानंतर उद्घाटन समारंभ घेण्यात येणार असल्याचे ग्रापंचायत सदस्य अनिल चव्हाण यांनी सांगितले आहे.
यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना पवार म्हणाल्या की, सर्वसामान्य लोकांना किमान प्राथमिक आरोग्यसेवा तातडीने मिळायला हव्यात. नीरा येथे आता मोठी इमारत झाली आहे. रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत, त्यामुळे लोकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपचार घ्यावेत. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णासेवेकडे सेवाभाव वृत्तीने पाहावे आणि त्यांची सेवा करावी, असे आवाहन केले. यावेळी पंचायत समिती सदस्य गोरखनाथ माने, ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, भाऊसाहेब धायगुडे, किरण जेधे, पाटोळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. तेजल बोराटे, गणेश जाधव,आरोग्य सेवक शिवाजी चव्हाण, रवींद्र मोहिते, औषध निर्माता नंदकुमार कर्वे उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)