नीरा नरसिंहपूरमध्ये पॅनकार्ड शिबीर

नीरा नरसिंहपूर-छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त पॅनकार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. श्री लक्ष्मी-नृसिंह अन्नछत्र सेवा मंडळ नीरा नरसिंहपूर व शिवरत्न पॅन कार्ड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने घेतलेल्या शिबीरामध्ये 50 जणांनी पॅनकार्डसाठी प्रकरण दाखल केली. नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) श्री लक्ष्मी नृसिंह अन्नछत्र सेवा मंडळ अन्नछत्र भवनात पॅनकार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. माजी सरपंच श्रीकांत दंडवते यांचे हस्ते छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. शिवरत्न पॅन सेंटरचे मोरे, अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष प्रसाद दंडवते, गौरव दंडवते, शिवाजी गोडसे, तुकाराम भंडलकर, संदीप कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. पॅनकार्ड शिबीरात गावातील सर्व नागरिकांनी सहभागी होऊन आपले पॅन कार्डसाठी अर्ज दाखल केले. यामध्ये चार दिवसांत पॅनकार्ड मिळणार आहे. तर उमेद बचत गटातील महिलांसाठी सवलतीच्या दरात पॅनकार्ड देण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)