नीरा नरसिंहपूरमध्ये ईदनिमित्ताने पावसासाठी प्रार्थना

नीरा नरसिंहपूर- ईद-उल-अजहा (बकरी ईद) परिसरातील गावात सामुहिक नमाज पठण आणि प्रार्थना करून उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मागील तीन महिन्यांपासून या परिसरात पाऊस पडला नसल्याने पाऊस पडून पीक पाणी जोमात येण्यासाठी गावोगावी ईदनिमित्त प्रार्थना करण्यात आली, तसेच केरळमध्ये आलेल्या पुराच्या संकटातून नागरिकांची सुटका होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.नीरा नरसिहपूर परिसरात ईद-उल-अजहा (बकरी ईद) निमित्त पिंपरी बुद्रुक येथे मौलाना तय्यब शेख यांनी ईदगाह मैदानात नमाज पठण आणि प्रार्थना केली. बावडा येथील ईदगाह मैदानात मौलाना मुख्तार शेख यांनी नमाज पठण केले. लुमेवाडी येथील ईदगाह मैदानावर अलहाज मौलाना जाकीर शेख यांनी उपस्थित समाज बांधवांना नमाज पठण केले. तसेच अलहाज मौलाना अब्दुल गणी शेख यांनी बकरी ईदचे महत्त्व सांगून प्रार्थना केली. त्यामध्ये केरळमध्ये आलेल्या अतिपावसाचे संकट आणि इंदापूर तालुक्‍यात तीन महिने पावसाने ओढ दिल्याने शेतकरी व नागरिकासमोर उभा ठाकलेल्या संकटातून सुटका करण्याची विशेष प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर हाजी हाफीज फत्तेह मोहंमद जोधपूरी बाबा यांच्या दर्गाहमध्ये मजारवर फुलांची चादर घालून सामुहिक प्रार्थना आणि सलाम करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)