नीरा नदी पात्रात महास्वच्छता अभियानाचे आयोजन

माउली पालखीसोहळ्यानिमित्त चार जिल्ह्यांतील तीन हजार स्वयंसेवकांचे श्रमदान

नीरा – डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने नीरा नदीच्या पात्रात महास्वच्छता अभियान आयोजित केले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या निमित्त फलटण समितीतील चार जिल्ह्यांतील सुमारे तीन हजार स्वयंसेवक श्रमदान करून नीरा नदीची स्वच्छता करणार आहेत. नीरा ग्रामपंचायत आणि परिसरातील संस्थाही या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावर नीरा नदीच्या पात्रात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना स्नान घालण्यात येते. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने स्वच्छता दूत पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि. 15) सकाळी 7 वाजता सातारा जिल्ह्यातील श्री दत्त घाट आणि पुणे जिल्ह्यातील श्री महादेव घाट या दोन्ही बाजूकडील नदी पात्रात स्वच्छता अभियान करण्यात येणार आहे. स्वच्छता अभियानात फलटण समितीतील सातारा जिल्ह्यातील खंडाळा, कोरेगाव, फलटण, पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, बारामती, पुरंदर, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा या तालुक्‍यातील सुमारे तीन हजार सदस्य श्रमदानात सहभागी होणार आहेत.

हे संपूर्ण अभियान आमलात आणताना प्रशासनाच्या सहकार्याने; परंतु प्रशासनावर कोणताही अतिरीक्त ताण पडणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक सदस्याला हात मोजे, मास्क, झाडु, कचरा उचलण्यासाठी लागणारे साहित्य पुरवण्यात येणार आहे, तसेच जमा झालेला सर्व कचरा डंपिंग ग्राउंडपर्यंत खासगी वाहनाने वाहून पोचवला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)