नीरा नदीत सोडलेल्या पाण्याने सातारा जिल्ह्यातील काठावरच्या गावांत समाधान

वालचंदनगर/ फलटण – इंदापूर तालुक्‍यातील भोरकडवाडी, कळंब भागात नीरा नदीत पाणी सोडण्यात आल्याने डिसेंबरमध्ये 90 टक्‍के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे नीरा नदीकाठचा शेतकरी सुखावला आहे. या पाण्यामुळे दोन महिन्यांपुरती तरी चिंता मिटली आहे. तसेच दुष्काळात होरपळणाऱ्या सातारा,सोलापूर आणि पुणे येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

नीरा नदीच्या पाण्यावर सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील हजारो शेतकरी अवलंबून आहेत. या तीनही जिल्ह्यांतील नदीकाठच्या शेतकऱ्यांना नदीचे पाणी वरदान ठरलेले आहे. नदीच्या पाण्याच्या विश्‍वासार्हता येथील शेतकरी योग्य पिकाची निवड करून उत्पादन घेण्यात यशस्वी होत आहेत. परंतु गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच नदी कोरडी पडल्याने चारा आणि पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झालेला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नदीकाठच्या शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यात यावे म्हणून नदीच्या पात्रातच उपोषण केले होते. गेल्या महिन्यात पाण्याच्या पातळीत घट होत चालल्याने या भागातील शेतकऱ्यांनी पुन्हा धास्ती घेतले होते. मात्र, दोन दिवसांपासून पाण्याच्या पातळीत वाढ होत नदीचे पात्र शंभर टक्‍के भरलेले आहे. या पाण्याची योग्य काळजी घेऊन वापर केल्यास मार्च अखेरपर्यंत पाणी पुरेल, असे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सांगितले. नीरा नदीच्या पात्रात गेल्या दोन दिवसापासून वरचेवर पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आहे. गुरूवारी सकाळी कळंब, भोरकडवाडी, कळंबोली भागातील नदीपात्रात 100 टक्‍के पाणीसाठा झाला आहे.

गेल्यावर्षी दुर्लक्ष झाल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. चारा आणि पाण्याची परिस्थिती निर्माण झालेली होते. हिरवा चारा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना दुसऱ्या जिल्ह्यातील चढ्या भावाने खरेदी करण्याची वेळ आलेली होती. मात्र यावर्षी तालुक्‍यात पाऊस समाधानकारक झाला नसला तरीही नदीच्या पात्रात नोव्हेंबर अखेर 100 टक्‍के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांतून समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास आणखी काही दिवस पाणीसाठा राहिल, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्‍त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)