नीरा नदीत बुडून युवकाचा मृत्यू

करंजे- होळ (ता. बारामती) येथील नीरा नदी पात्रातून मध्यभागी असलेल्या ढगाई देवी मंदिरात दर्शनासाठी पोहत निघालेल्या तरूणाचा मध्यभागी गेल्यानंतर दम लागून मृत्यू झाल्याची घटना बुधवार (ता. 10) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. दरम्यान, त्याचा मृतदेह आज (गुरुवारी) पाण्यावर तरंगताना आढळून आला.
गणेश मारूती पवार (वय 24, रा. जेजुरी, ता. पुरंदर) असे पाण्यात बुडून मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर प्रसाद रामचंद्र जगताप (वय 26) यांनी वडगाव निंवाळकर पोलिसांना या घटनेची खबर दिली. याबातची माहिती अशी की, नीरा नदी तीरावर आलीकडे व पलीकडे अशी दोन ढगाई देवीची मंदीरे आहेत. पाण्यात मध्यभागी एक मंदीर आहे. नदीपात्रात असलेल्या मंदिरात पाण्यामुळे जाता येत नाही. गणेश व प्रसाद आलीकडच्या ढगाई मंदिरात दर्शन करून नदी पात्रातील मध्यभागी असलेल्या ढगाई देवी मंदिरात दर्शनाला पोहत निघाले होते. प्रसाद पुढे पोहत गेला मागुन गणेश पोहत येत होता. मध्यभागी गेल्यावर दम भरल्याने गणेश पाण्यात बुडू लागला. आजुबाजुच्या लोकांनी आरडा ओरडा केलापण नदी पात्र मोठे असल्याने वाचवण्यासाठी काही करता आले नाही.
दरम्यान या घटनेनंतर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक जीटी संकपाळ, तहसीलदार हनुमंत पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्‍वरचे संचालक सिद्धार्थ गिते, उपसरपंच संतोष होळकर, यांनी घटनास्थळी भेट देउन मदत कार्य केले. दरम्यान, स्थानिक भोई समाजाच्या मदतीतून पाण्यात रात्री उशीरपर्यंत शोध सुरू होता. तसेच जलसंपदा विभागाचे अभियंता जमदाडे यांच्याशी संपर्क साधून नीरा नदीवरील
कोऱ्हाळे खुर्द येथील बंधाऱ्यातील पाणी सोडून नदीतील पाणी पातळी कमी करता येते का, याचीही चाचणी केली; परंतु अंधार पडल्यामुळे बचावकार्यला अडथळा निर्माण होत असल्याने बचावकार्य थांबविण्यात येऊन आज (गुरुवारी) ते पुन्हा सुरू करण्यात येणार होते मात्र, त्यापूर्वीच गणेश पवार याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलवून मृतदेह शवविच्छेदनासाठी सुपे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

  • दोन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
    मृत गणेशला पोहता येत होते. तसेचे त्याचे दोन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता तर तो जेजुरी येथील कंपनीत कामाला होता, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)