नीरा नदीतून पाणी उपशासाठी विनापरवाना खोदला रस्ता

कुरवली- बारामती, कळंब, बावडा, नृसिंहपूर (बीकेबीएन) रस्त्यावर इंदापूर तालुक्‍यातील पश्‍चिम भागात तावशी ते कळंब दरम्यान शेतीच्या पाण्यासाठी पाइपलाइन करताना स्थानिक शेतकऱ्यांनी खोदलेल्या रस्त्याच्या ठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना या रस्त्याने प्रवास करताना कसरत करावी लागत आहे.
नीरा नदीलगत असणाऱ्या तावशी, उद्घट, जांब, कुरवली, चिखली, कळंब या भागातील शेतकरी शेतीच्या पाण्यासाठी नीरा नदीतून पाणी उपसा करताना अनेक शेतकऱ्यांना रस्ता खोदाई करून पाइपलाइन घ्यावी लागते. काही शेतकरी रीतसर पूर्व परवानगी घेऊन रस्ता खोदाई करतात, तर काही शेतकरी विनापरवानगी रस्ता खोदाई करतात. शेतीच्या पाण्यासाठी पाइपलाइन करताना संबंधित शेतकरी सार्वजनिक बांधकाम विभागाची पूर्व परवानगी घेऊन रस्ता खोदून झाल्यानंतर मुरुम माती टाकून खोदलेल्या रस्ताची तात्पुरती डागडुजी करतात. मुरुम मातीने रस्त्यावरील खोदाई बुजलेली असल्याने काही दिवसांत खोदलेला रस्ता पूर्ण उखडला जाऊन त्या ठिकाणी खड्डा पडतो. आषाढी वारीसाठी पंढरपूरला संत निळोबा महाराज, संतराज महाराज पालखी यांसह लहान-मोठ्या दिंड्या या रस्त्याने जात असतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने किमान पालखी मार्गावरील खड्डे दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.

  • सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
    सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्व परवानगी घेऊन रस्ता खोदाई केलेल्या शेतकऱ्यांनी रस्त्याची व्यवस्थित डागडुजी केली की नाही, याबाबत तपासणी करणे आवश्‍यक आहे. या खड्ड्यामुळे बीकेबीएन रस्त्यावर प्रवास करताना अवजड वाहन चालकासह दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.
  • रात्रीच्या वेळी चोरून केली जातो खोदाई
    सार्वजनिक बांधकाम विभागात चौकशी केली असता रस्ता खोदाई साठी किमान 35 हजार रुपये खर्च येत असल्याने रात्रीच्या वेळी चोरून रस्ता खोदाई केली जात असल्याचे समजले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)