नीरा डाव्या कालव्यातील पाण्यावर डल्ला

रेडा- इंदापूर तालुक्‍यातील निमगाव केतकी पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या गावांसाठी नीरा डाव्या कालव्यातून उन्हाळी आवर्तन सुरू आहे; परंतु पाटबंधारे विभागाचे अभियंता चिरीमीरी घेत आसल्याने सायफनद्वारे सुरू असलेली पाण्याची चोरी त्यांना दिसत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या पाणी चोरीमुळे रेडा, लाखेवाडी, पीठेवाडी रेडा, लाखेवाडी, पीठेवाडी भागात हे पाणी पोहचले नसल्याने येथील पिके जळू लागली आहेत. तर आता कालवा अर्धा अधिक खाली झाल्याने या भागात येणारे तिन महिने अतिशय बिकट असणार असून प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे या भागात पाटबंधारे विभागाच्या नावाने शिमगा सुरू आहे.
इंदापुर तालुक्‍यातील लाखेवाडी, पिठेवाडी या गावामध्ये उन्हाळ्यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असताना दुसरीकडे येथील नीरा डाव्या कालव्यातून पिकांना पाणी देण्यासाठी दररोज लाखो लिटर पाण्याची सायपन पद्धतीने दिवसाढवळ्या चोरी होत आहे. पाणी चोरीमुळे पाणी शेतात पोहोचणेच अवघड झाले आहे; परंतु शाखा अभियंता व अधिकारी वर्ग याकडे कानाडोळा करीत आहे. हे प्रकार चालवण्यासाठी चिरीमिरी घेतल्याचा आरोप लाभधारक शेतकऱ्यांनी केला आहे. तालुक्‍यातून नीरा डावा कालवा वाहत जातो. यावर निमगाव केतकी पासून लाखेवाडी पिठेवाडी (फाटा क्र 59) गावे अवलंबून आहेत. तर या गावांमध्ये पाण्याची बिकट परिस्थीती निर्माण झाली आहे, तरी देखील सायफनने विहिरी व शेततळी भरली जात आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला वणवण भटकावे लागत असून, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्‍न ही गंभीर बनला आहे. दुष्काळी भागातील पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. अशा परिस्थितीत नीरा डावा कालव्यालगतच्या बागायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊस उभा आहे. कालवा भरून वाहत असताना उसासाठी लगतच्या काही शेतकऱ्यांनी काही पाटकऱ्यांना हाताशी धरून कालव्यातून सरसकट पाणी चोरी सुरू केली आहे. काही जणांनी मोठमोठेले पाइपलाइन थेट कालव्यामध्ये टाकून मोटारीद्वारे उपसा सुरू केला आहे. हे पाणी पाटाद्वारे थेट शेतामध्ये पोहोचविले जात आहे, तर काहिंनी या पाण्यावर आपल्या विहिरींही भरून घेतल्या आहेत. दिवसाढवळ्या पाण्याची चोरी होत असताना संबंधित पाटकरी व काही अधिकारी याकडे दुर्लक्षकरून अर्थपूर्ण व्यवहारात मग्न असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे.

  • हे प्रकार सातत्याने सुरूच असतात. आमच्याकडे कर्मचारी कमी आहेत. तरीही आम्ही माहिती घेऊन कार्यवाही करू.
    प्रवीण कोल्हे, कार्यकारी अभियंता, नीरा डावा कालवा
  • गेज कमी मिळत असल्याने पाणी पूर्ण क्षमतेने येत नाही. सायपन चोरांना आळा घालण्यासाठी स्पेशल स्कॉड तैनात केले आहे. जर पाणी चोरी आढळून आल्यास थेट कारवाई केली जाईल .
    – राम घूटकडे, उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे विभाग, निमगाव केतकी

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)