नीरामध्ये नगरपंचायत करा

 भीम सामाजिक संस्थेची मागणी

नीरा- नीरा शहराची वाढती लोकसंख्या व लोकांसाठी नागरी सोई-सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायत अपुरी पडत असल्याने शहरासाठी नगरपंचायत बनविण्यात यावी, अशी मागणी नीरा येथील भीम सामाजिक संघटनेनी केली आहे.
शहराची लोकसंख्या 20 हजाराचा आकडा पार करून गेली आहे. आजूबाजूच्या गावातील लोक व नोकरदारवर्ग राहण्यासाठी शहरात येत आहेत. त्यामुळे पुढील काळात लोकसंख्या वाढणार तर आहेच त्याचबरोबर जागेचा व नागरी सुविधांचा प्रश्न देखील गंभीर होणार आहे. हे सर्व प्रश्न सोडविणे ग्रामपंचायत स्थरावर अवघड आहे. त्याचबरोबर येथील व्यापारी वर्गाला व्यवसाय वाढीसाठी वित्तसहाय्य घेताना स्थावर मालमत्तेचे मूल्य कमी धरल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पुढील काळात होणाऱ्या ग्रामसभेमध्ये नीरा ग्रामपंचायती ऐवजी नीरा नगरपंचायत स्थापन करण्याचा विषय घेण्याची मागणी संघटनेने केली आहे.

  • सरकारी नियमानुसार दहा हजारांच्या पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरात नगरपंचायत किंवा नगरपरिषद असायला हवी. मात्र, लोकांना नागरी सुविधा देण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत असताना सुद्धा येथील कारभारी आपल्या सोईसाठी नगरपंचायत निर्मितीकडे दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा विषय संघटनेच्या माध्यमातून मांडणार आहे.
    अमोल साबळे, अध्यक्ष भीम सामाजीक संघटना 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)