नीरव मोदी ब्रिटनमध्येच वास्तव्यास असल्याच्या वृत्तास ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दिला दुजोरा

लंडन: पंजाब नॅशनल बॅंकेचे हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात फरार झालेल्या नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणासाठी भारताने ब्रिटनकडे प्रत्यार्पण प्रस्ताव पाठवला होता. काही दिवसांपूर्वी नीरव मोदी याच्या विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. दरम्यान, नीरव मोदीचा ठावठिकाणा सापडला आहे.

नीरव मोदी सध्या ब्रिटनमध्ये वास्तव्यास असल्याच्या वृत्तास ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. तसेच त्याच्या प्रत्यार्पणासाठी सीबीआयने योग्य माध्यमातून विनंती केली आहे, अशी माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे.

खोटी हमी देवून हा इतका मोठा घोटाळा करण्यात आला असून सध्या नीरव मोदी यांच्या 11 राज्यांमधील 35 ठिकाणांवर छापे मारण्यात आले आहेत. तसेच नीरव मोदी यांच्या 29 जागा आणि 105 बॅंक खाते देखील आतापर्यंत गोठवण्यात आली आहेत. 2011 पासून नीरव मोदी व्यवहारासाठी खोटा परवाना वापरात होता.

निरव मोदी याच्या विरुद्ध सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी, सीबीआय, आयटी आणि डीआरआय हे विभाग कसून चौकशी करीत आहेत. नीरव मोदीविरुद्ध महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) खटला दाखल केला असून, त्यात सूरत येथील न्यायालयाने मोदीविरुद्ध अटक वॉरन्ट जारी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)