नीरव मोदी, चोक्‍सीचे अनधिकृत बंगले करणार जमीनदोस्त

मुंबई – पीएनबी घोटाळा करून देशाबाहेर पळून गेलेले हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी यांचे अनधिकृत बंगले जमीनदोस्त केले जाणार आहेत. ते पॉश बंगले रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये आहेत.

अनधिकृत बंगल्यांवर कारवाई करत नसल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी राज्य सरकारची कानउघाडणी केली. यापार्श्‍वभूमीवर, राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यामध्ये मोदी आणि चोक्‍सीच्या बंगल्यांवर हातोडा चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कदम यांनी अलिबाग परिसरात 121 तर मुरूड परिसरात 151 अनधिकृत बंगले असल्याची माहिती दिली.

किनारपट्टी नियमन विभागाच्या (सीआरझेड) नियमांची पायमल्ली करून संबंधित बंगले बांधण्यात आले आहेत. याशिवाय, मंजूर आराखड्यांना अनुसरून ते बांधण्यात आले नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. मोदीचा बंगला किहीम तर चोक्‍सीचा बंगला आवास गावात आहे. पीएनबी घोटाळा उघड झाल्यानंतर मोदी आणि चोक्‍सीची प्रचंड मालमत्ता केंद्रीय यंत्रणांनी जप्त केली. आता त्यांचे अनधिकृत बंगले रडारवर आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)