नीरव मोदी आणि मल्ल्याचा संबंध बेकायदेशीर रहिवाशांशी जोडला

सामंजस्य करारावरील स्वाक्षऱ्यांसाठी इंग्लंडकडून आग्रह

नवी दिल्ली – हायप्रोफाईल आर्थिक गुन्ह्यातील फरार आरोपी नीरव मोदी आणि विजय मल्ल्यायंच्या प्रत्यार्पणाची प्रक्रियेला इंग्लंडमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना मायदेशी पाठवण्याच्या बहुप्रतिक्षित कराराशी जोडू पहात आहे. स्वाक्षऱ्या झाल्यामुळे या फरार आरोपींची प्रत्यार्पणाची प्रक्रिया अधिक सुकर होणार आहे, असा दावा भारत दौऱ्यावर आलेले इंग्लंडचे कट्टरवादाविरोधी विभागाचे राज्यमंत्री बॅरोन्स विल्यम्स यांनी केला आहे. या करारामुळे इंग्लंडमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 75 हजार भारतीयांना मायदेशी पाठवणे सोपे होणार आहे.

भारत आणि इंग्लंडमधील या सामंजस्य करारावरील अंतिम स्वाक्षरीचा मुद्दा विल्यम्स यांनी केंद्रीय गृहराज्य मंत्री किरेन रिजिजू यांच्याबरोबरच्या चर्चेच्यावेळी उपस्थित केला. सुमारे चार तास चाललेल्या या चर्चेच्यावेळी विल्यम्स यांनी या सामंजस्य करारावर औपचारिक स्वाक्षऱ्या होण्यावर विशेष भर दिला.

या स्वाक्षऱ्या झाल्यास इंग्लंडमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना महिन्याभरात परत पाठवणे ब्रिटीश अधिकाऱ्यांना शक्‍य होणार आहे.

यावेळी रिजिजू यांनी नीरव मोदी, मल्ल्या आणि अन्य आरोपींचा मुद्दा उपस्थित केला. मात्र त्यांच्या प्रत्यार्पणाचा संबंध सामंजस्य कराराशी जोडला जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. नीरव मोदी इंग्लंडमध्येच असल्याला विल्यम्स यांनी दुजोराही दिला.

इंग्लंडमधील बेकायदेशीर रहिवाशांना मायदेशी आणण्याच्या काराराच्या मसुद्यावर रिजिजू आंनी 10 जानेवारीला स्वाक्षरी केली आहे. तर अंतिम सामंजस्य करारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी एप्रिल महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर गेल्यावर स्वाक्षऱ्या करणे अपेक्षित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)