नीरव मोदीच्या “समुद्र महाल’वर ईडीचा छापा

10 कोटींच्या अंगठीसह कोट्यवधीची मालमत्ता जप्त
मुंबई – पीएनबीतील कोट्यवधी रुपयांच्या महाघोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार हिरे व्यावसायिक नीरव मोदीशी संबंधित ठिकाणांवर शनिवारी ईडी आणि सीबीआयने संयुक्तरित्या कारवाई केली. मुंबईतील “समुद्र महाल’ या इमारतीतील नीरव मोदीच्या निवासस्थानावर टाकण्यात आलेल्या 10 कोटी रुपयांची एक अंगठी आणि 1.40 कोटी रुपयांचे घड्याळ जप्त केले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळपर्यंत मोदीच्या निवासस्थानात शोध मोहीम सुरू होती. यादरम्यान 15 कोटी रूपयांचे जुने दागिने, 1.40 कोटींची आधुनिक घड्याळे आणि एम. एफ.हुसेन, के. के. हेबर आणि अमृता शेरगिल यांची 10 कोटी रूपयांची पेटिंग्ज जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर इडीने 10 कोटींची एक हिऱ्याची अंगठीही जप्त केली आहे.

पीएनबी घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदी आणि गीतांजली जेम्सचे मेहुल चोक्‍सी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, मोदी आणि चोक्‍सी कुटुंबीयासह जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच देश सोडून फरार झाले आहेत.

दरम्यान, आतापर्यंत 251 ठिकाणी छापे टाकण्यात आले असून यात कोट्यवधी किंमतीचे हिरे, सोने आणि दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत. नीरव मोदी समूह आणि मेहुल चौक्‍सी समूहाच्या अनेक संपत्ती जप्त करण्यात आले आहेत. या संपत्तीचे मूल्य 7,638 कोटी रूपये इतके आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)