पीएनबी घोटाळ्याबद्दल ईडीचे पाऊल
मुंबई – देशाबाहेर पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्यांच्या साथीदारांविरोधात आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुमारे 12 हजार पानी आरोपपत्र दाखल केले. तब्बल 13 हजार कोटी रूपयांच्या पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) घोटाळ्याबद्दल ईडीने येथील विशेष न्यायालयात पहिले आरोपपत्र दाखल केले.

ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉण्डरिंग ऍक्‍टच्या (पीएमएलए) अंतर्गत हे पाऊल उचलले. नीरव आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित जप्तीचा तपशीलही आरोपपत्रात नमूद करण्यात आला आहे. ईडीच्या पहिल्या आरोपपत्रात केवळ नीरव आणि त्याच्या साथीदारांचा समावेश आहे. नीरवचा मामा आणि घोटाळ्याचा सहआरोपी मेहुल चोक्‍सी याच्याविरोधात दुसरे आरोपपत्र दाखल केले जाईल, असे समजते.

याप्रकरणी सीबीआयने याआधीच दोन आरोपपत्र दाखल केले आहेत. पीएनबी घोटाळ्याचा तपास सीबीआय, ईडी आणि इतर केंद्रीय यंत्रणा करत आहेत. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यापूर्वीच नीरव आणि चोक्‍सीने देशाबाहेर पलायन केले. सध्या त्यांनी अमेरिकेत आश्रय घेतल्याचा संशय आहे. मात्र, त्यांचा नेमका ठावठिकाणा समजू शकलेला नाही. घोटाळा चव्हाट्यावर आल्यानंतर ईडीने नीरव आणि चोक्‍सीची मोठ्या प्रमाणात मालमत्ता जप्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)