नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी आणि अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदीची बहिण पूर्वी मोदीच्या विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. पंजाब नॅशनल बॅंकेमध्ये 2 अब्ज डॉलरच्या आर्थिक गैरव्यवहार विषयी ही रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस म्हणजे पूर्वी मोदीविरोधात जगभरात कोठेही अटक करण्याचे वॉरंट आहे. सक्‍तवसुली संचलनालयाने केलेल्या विनंतीनुसार ही नोटीस बजावण्यात आली आहे.

पंजाब नॅशनल बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहार विषयी मार्चमध्ये पहिले आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. बॅंकेच्या ब्रॅन्डी हाऊस शाखेमध्ये आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचा आरोप पूर्वी मोदीवर ठेवण्यात आला आहे. इंग्रजी, गुजराथी, हिंदी बोलणाऱ्या पूर्वी मोदी या बेल्जियन नागरिक आहेत.

फरारी व्यक्‍तीविरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर इंटरपोलचे सदस्य असलेल्या 192 देशांना या व्यक्तीस अटक करणे किंवा ताब्यात घेण्याची सूचना देण्यात येते. त्यानंतरच अटक केलेल्या आरोपीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. नीरव मोदीच्या अमेरिकेतील उद्योगातील वरिष्ठ एक्‍झिक्‍युटिव्ह मिहीर भन्साळीविरोधातही अलिकडेच अशीच रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. नीरव मोदीविरोधातही ईडी आणि सीबीआयकडून सुरू असलेल्या तपासाचा भाग म्हणून अशीच रेड कॉर्नर नोटीस काही काळापूर्वी जारी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)