नीरव मोदीच्या परदेशांतील मालमत्ता ईडीच्या रडारवर

नवी दिल्ली – पीएनबी घोटाळ्याचा सूत्रधार असणारा हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या परदेशांतील सुमारे 4 हजार कोटी रूपयांच्या मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आल्या आहेत. त्या मालमत्ता प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉण्डरिंग ऍक्‍टच्या (पीएमएलए) अंतर्गत जप्त करण्यासाठी ईडी प्रयत्नशील आहे.

नीरव आणि त्याच्या कुटूंबीयांच्या मालकीच्या घरांबरोबरच त्यांच्या बॅंक खात्यांवर टाच आणण्यासाठी पाऊले उचलली जात आहेत. त्यासाठी अमेरिका, ब्रिटन, स्वित्झर्लंड, हॉंगकॉंग आणि सिंगापूर या देशांशी संपर्क साधला जाणार आहे. नीरवच्या परदेशांतील मालमत्तांचा शोध घेण्याची जबाबदारी ईडीने विशेष पथकाकडे सोपवली होती. त्या पथकाकडून मिळालेल्या माहितीनंतर आता पुढील कारवाईची तयारी ईडीने चालवली आहे.

-Ads-

याआधी इतर प्रकरणांत अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांतील मालमत्ता जप्त करण्याचा अनुभव ईडीच्या गाठिशी आहे. नीरवने खूप आधीच देशाबाहेर पलायन केले. त्याने ब्रिटनमध्ये आश्रय घेतल्याची माहिती आहे. त्याच्या अटकेसाठी देशातील यंत्रणांच्या प्रयत्नांतून इंटरपोलने वॉरंट (रेड कॉर्नर नोटीस) जारी केले आहे.

ब्रिटनने त्याला ताब्यात द्यावे यासाठी संबंधित यंत्रणा प्रयत्नशील आहेत. ईडीने आतापर्यंत नीरव आणि त्याच्या कुटूंबीयांच्या देशातील सुमारे 700 कोटी रूपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)