नीरव मोदीच्या देश-विदेशातील 637 कोटींच्या संपत्तींवर टाच 

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) सुमारे 13 हजार कोटी रुपयांचा गंडा घालून परदेशात पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीला सोमवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दणका दिला असून ईडीने नीरव मोदीच्या 637 कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणली आहे.
जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत हॉंगकॉंगमधून 22. 69 कोटी रुपयांचे दागिने व हिरे, दक्षिण मुंबईतील नीरव मोदीच्या बहिणीच्या नावावर असलेले 19.5 कोटी रुपयांचे घर ईडीने जप्त केले आहे. त्याच बरोबर नीरव मोदीची बहिण पुर्वी मोदी व तिच्या पतीच्या सिंगापूरमधील कंपनीचे बॅंक खाते गोठवण्यात आले आहे. यात सुमारे 44 कोटी रुपये आहेत. तसेच अन्य पाच बॅंक खातीही गोठवण्यात आली असून यात 278 कोटी रुपये आहेत. याशिवाय लंडनमधील 56. 97 कोटी रुपये आणि न्यूयॉर्कमधील 216 कोटी रुपयांची दोन घरंही जप्त करण्यात आली आहे.
पंजाब नॅशनल बॅंकेतील घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदी, त्याची अमेरिकी पत्नी अमी मोदी, बेल्जियन नागरिक असलेला भाऊ निशाल मोदी व मामा मेहुल चोकसी यांच्यासह अन्य कर्मचारी व बॅंकेचे अधिकारी आरोपी आहेत. मुंबईतील सीबीआय न्यायालयात नीरव मोदी याच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून काही महिन्यांपूर्वी सीबीआयच्या विनंतीवरून इंटरपोलने त्याच्यावर रेड कॉर्नर नोटीस बजावली होती.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)