नीरव मोदीचे आठ साथीदार देश सोडून पळाले

नवी दिल्ली : पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सीला भारतात परत आणण्यासाठी भारतीय यंत्रणा प्रयत्न करत आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये नीरव मोदीचे आठ घोटाळेबाज साथीदारसुद्धा परदेशात पळून गेल्याचे समोर आले आहे.

अंमलबजावणी संचलनालयातील सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, 13 हजार 700 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील नीरव मोदीचे आठ साथीदार भारतीय पासपोर्टवर जगभर प्रवास करत आहेत. नीरवचे हे सहकारी ज्याप्रकारे अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) दिशाभूल करत आहेत, त्यावरुन त्यांना फरार म्हणता येईल, असे सूत्रांनी सांगितले. मुंबईतील पासपोर्ट कार्यालयाला ईडीनं एक पत्र पाठवलं आहे. आठ भारतीय नागरिक नीरवच्या हाँगकाँग आणि दुबईतील कंपन्यांमध्ये समभागधारक आणि संचालक असल्याची माहिती या पत्रातून पासपोर्ट कार्यालयाला देण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय पासपोर्टवर जगभरात प्रवास करणाऱ्या नीरव मोदीच्या साथीदारांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिली. या व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही ईडीकडून केला जात आहे. मात्र नीरवचे साथीदार ईडीला वारंवार चकवा देत आहेत. या सर्व व्यक्तींची माहिती ईडीनं पासपोर्ट कार्यालयाला दिली आहे. पासपोर्ट कार्यालयाला या व्यक्तींची प्रवासासंबंधीची कागदपत्रं रद्द करता यावीत, यासाठी ईडीनं हे पाऊल उचललं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)