नीरव मोदीची 255 कोटींची हॉंगकॉंगमधील संपत्ती “ईडी’कडून जप्त 

हिरे आणि मौल्यवान दागिन्यांचा समावेश 

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बॅंकेतील 2 अब्ज डॉलरच्या कथित गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदीची हॉंगकॉंगमधील तब्बल 255 कोटी रुपयांची संपत्ती सक्तवसुली संचलनालयाने जप्त केली आहे. “मनी लॉंडरिंग’ प्रतिबंधक कायद्याखाली ही कारवाई केली असल्याचे “ईडी’ने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जप्त करण्यात आलेली संपत्ती नीरव मोदीच्या दुबईतील कंपन्यांद्वारे 26 जहाजांमधून हॉंगकॉंगमधील कंपन्यांमध्ये नेण्यात आली. पंजाब नॅशनल बॅंकेप्रकरणी नीरव मोदीविरोधात प्रकरण दाखल करण्यात आल्यानंतर ही संपत्ती हलवण्यात आली होती. या मौल्यवान वस्तूंमध्ये हिरे आणि ज्वेलरीचा समावेश आहे. ही मौल्यवान संपत्ती हॉंगकॉंगमधील नीरव मोदीच्या कंपनीत ठेवलेली होती, असे “ईडी’ने म्हटले आहे.

जप्त करण्यात आलेल्या संपत्तीबाबतच्या मालकीबाबतचे पुरावे मिळवल्यानंतर त्या मौल्यवान ऐवजाची किंमत, मालवाहू जहाज, वाहतुक कंपनी, जहाज कंपनीची मालकी आदी तपशीलही तपासादरम्यान मिळवण्यात आले. आता ही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता एकूण 34.97 दशलक्ष डॉलर किंवा 255 कोटी रुपयांची आहे, असेही “ईडी’ने म्हटले आहे. या जप्तीची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी न्यायालयाचेआदेश लवकरच हॉंगकॉंगला पाठवण्यात येतील, असेही “ईडी’ने म्हटले आहे. जप्तीच्या या कारवाईमुळे नीरव मोदीची आतापर्यंत 4,744 कोटी रुपयांची मालमता जप्त करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)