नीरव मोदीचा भाऊ ५० किलो सोनं घेऊन फरार

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटींचा घोटाळा करून परदेशात पळालेल्या नीरव मोदीचा सावत्र भाऊ नेहल हा दुबईतील एका सेफहाऊसमधून तब्बल ५० किलो सोनं घेऊन फरार झाला आहे. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदीविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केल्याची माहीती मिळाल्यानंतर नेहलने ५० किलो सोने घेऊन पळ काढला आहे.

पीएनबी घोटाळ्याचा तपास करीत असलेली सीबीआय दुबईपर्यंत पोहोचू शकते, अशी भीती वाटल्याने नेहलने विक्रीसाठी ठेवलेलं सर्व सोनं घेऊन दुबईतून पळ काढल्याचं सूत्रांनी सांगितलं. नेहल हा मेहुल चोक्सीची कंपनी गीतांजली जेम्समध्ये कार्यरत होता. मुंबईतील विशेष कोर्टात गुरुवारी ईडीने २४ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले असून यात नेहलचाही समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)