नीरव मोदीचा निकटवर्तीय श्‍यामसुंदर वाधवाला अटक

मुंबई – देशाबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याचा निकटवर्तीय श्‍यामसुंदर वाधवा याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. तब्बल 12 हजार कोटी रूपयांच्या पीएनबी घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

वाधवाला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. तो फायरस्टार ग्रुप या मोदीच्या कंपनीचा उपाध्यक्ष आहे. सातत्याने मोदीच्या संपर्कात असणारा वाधवा त्याच्या निर्देशावरून मनी लॉण्डरिंगमध्ये सामील असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. संबंधित प्रकरणात ईडीकडून झालेली ही पहिलीच अटक आहे. वाधवाच्या अटकेमुळे घोटाळ्यामागील सत्य उघड होण्यास मदत होईल, असा विश्‍वास ईडीला वाटत आहे.

पीएनबी घोटाळा उघड झाल्यानंतर ईडीने मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्‍सी यांच्या विरोधात मनी लॉण्डरिंग संदर्भात दोन गुन्हे दाखल केले. त्यानंतर ईडीने आतापर्यंत देशभरात 251 छापे टाकले. या कारवाईतून मोदी आणि चोक्‍सीच्या मालकीची 7 हजार 664 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यात जमीन, सदनिका यांच्याबरोबरच हिरे, सोने आदींचा समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)