नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय पोलीस यंत्रणा असणाऱ्या इंटरपोलने मिहीर आर.भन्साळी याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली. भन्साळी हा देशाबाहेर पलायन केलेला हिरे व्यापरी नीरव मोदी याचा निकटवर्तीय आहे. तो फायरस्टार इंटरनॅशनल या नीरवच्या अमेरिकेतील कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी भन्साळीच्या विरोधात इंटरपोलने पाऊल उचलले.

रेड कॉर्नर नोटिसीद्वारे इंटरपोलने आपले सदस्य असणाऱ्या 192 देशांना भन्साळीला अटक करण्याची सूचना केली आहे. पीएनबी घोटाळा उघड झाल्यानंतर भन्साळीने नीरवचा भाऊ निहाल याच्यासमवेत दुबईहून तब्बल 50 किलो सोने आणि मोठ्या प्रमाणात रोकड घेतल्याचे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) निदर्शनास आले आहे. ईडीच्या विनंतीवरूनच इंटरपोलने भन्साळीविरोधात पाऊल उचलले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)