नीती आयोग स्टार्ट अप्सना मदत करणार

नवी दिल्ली -अटल नवकल्पना अभियानांतर्गत नीती आयोग, येत्या 26 तारखेला अटल न्यू इंडिया चॅलेंजचा प्रारंभ करणार आहे. अटल न्यू इंडिया चॅलेंज, पाच मंत्रालयांच्या सहकार्याने राबविले जाणार आहे. हवामान बदलाशी सुसंगत शेती, कचरा व्यवस्थापन यासारख्या 17 क्षेत्रांत, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत,विक्री योग्य उत्पादने तयार करण्यासाठी संभाव्य नवकल्पनाकार, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र, स्टार्ट अप्सकडून अटल नवकल्पना अभियानांतर्गत अर्ज मागवले जाणार आहेत.निर्मिती, तंत्रज्ञान याबाबत क्षमता दर्शवणाऱ्या अर्जदाराला एक कोटी रुपयांपर्यंतचे अनुदान मंजूर केले जाईल.

याशिवाय या अनुदानाला उत्पादनाच्या विविध टप्प्यांवरही आवश्‍यक ती मदत केली जाणार आहे. 26 तारखेला होणाऱ्या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री हरदीप सिंह पुरी, नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, अटल नवकल्पना अभियानाचे संचालक रामनाथन रामानन्‌, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत उपस्थित राहणार आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)