नीतीमूल्ये जपली तरच रिअल इस्टेट क्षेत्रात निभाव लागेल

संजय रूणवाल : बिझिनेस पद्धती आवश्‍यकतेनुसार बदलणे गरजेचे

नगर – केंद्र शासन व राज्य शासनाने नुकत्याच रिअल इस्टेट सेक्‍टरशी निगडित धोरणे ठरविली आहेत. त्याचा या क्षेत्रावर विपरित परिणाम झाला आहे. तरी हे सर्व शासन निर्णय स्वीकारणे सर्वांना क्रमप्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्वांनी यापुढे आळस झटकून उद्योगधंद्यात हे सर्व बदल अंगीकृत करून त्याप्रमाणे बिझिनेस पद्धती निश्‍चित करून आवश्‍यकतेनुसार व्यवसाय व व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पुणे येथील बिझिनेस मॅनेजमेंट स्पीकर संजय रूणवाल यांनी केले.

या असोसिएशन यांच्या वतीने रिअल इस्टेट सेक्‍टरमधील प्रचलित धोरणाप्रमाणे काळानुरूप बदलाव या विषयावर आयोजित कार्यशाळेत रूणवाल बोलत होते. याप्रसंगी असो.चे अध्यक्ष सुरेश परदेशी, उपाध्यक्ष प्रफुल्ल सुराणा, रमेश कार्ले, मकरंद कुलकर्णी, सलीम शेख, अशोक सातकर, अनिल मुरकुटे, मकरंद देशपांडे, प्रकाश आंधळे, आणेकर, अविनाश कुलकर्णी, संजय पवार, विवेक आपटे, संजय चांडवले, विजय पादीर, नंदकुमार बेरड, अजित माने, कर्नावट, प्रकाश जैन, नंदकिशोर घोडके, बाळासाहेब पवार, अनिल धोकरिया, एकनाथ जोशी, अनिल गाढवे, अशोक मवाळ, अंबुजा सिमेंटचे विभागीय अध्यक्ष वैभव बाबतीवाल, अमरिश खामितकर आदी उपस्थित होते.

रुणवाल म्हणाले, काळाप्रमाणे नीतीमूल्ये यापुढे जपून या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणे गरजेचे आहे. तरच आपला यापुढे रिअल इस्टेट क्षेत्रात निभाव लागू शकेल. अन्यथा आपण जगाच्या मागे पडत पडत व्यवसायावर विपरित परिणाम होऊन धंदे बंद पडण्याची सुद्धा शक्‍यता आहे. त्याचबरोबर शासनाने काही प्रोत्साहनपर चांगल्या योजना जाहीर केल्या आहेत. यात प्रामुख्याने ऑफर्डेबल हाऊसिंग स्कीम यातील बदल, सर्व्हिस टॅक्‍समध्ये सूट, प्रथम घर खरेदी करणाऱ्याला 50 हजारांची सबसिडी जाहीर केली आहे, याचे आम्ही स्वागत करतो. बिल्डर व ग्राहकांमधील वादाचे ऍब्रीट्रेशन विषयाचे नॉर्ममध्ये बदल केल्याचे सांगितले.

प्रास्ताविकात सुरेश परदेशी म्हणाले, शासनाने वर्षभरात लागू केलेल्या नोटबंदी, जीएसटी व रेरा या क्‍लिष्ट निर्णयामुळे रिअल इस्टेट सेक्‍टरवर विपरित पूर्णपणे होऊन मंदी आली आहे. सर्वांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. संजय रुणवाल यांच्या व्याख्यानामुळे योग्य व्यवसाय नीती ठेवण्यास मदत होईल, असे सांगितले.
सूत्रसंचालन सलीम शेख यांनी केले. आभार रमेश कार्ले यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)