नीति आयोगाने मंदीचा ठपका ठेवला रघुराम राजन यांच्यावर

नवी दिल्ली – देशात रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी त्यांच्या काळात जी धोरणे राबवली त्यामुळे देशातील अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला जी स्थिती आहे त्याला त्यांची धोरणेच कारणीभूत आहेत असे नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार यांनी म्हटले आहे.

आजच्या मंदीच्या स्थितीला नोटबंदी जबाबदार नाहीं असेही त्यांनी म्हटले आहे.
राजन यांनी बुडीत कर्जाविषयी कोणतेही निर्णय घेतले नाहीत त्यामुळे त्याचा दुष्परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला. नोटबंदीच्या काळात हजार आणि पाचशे रूपयांच्या नोटा रद्द केल्याचा तो परिणाम नव्हता असे राजीवकुमार यांनी आज एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

मोदी सरकार सत्तेवर आले त्यावेळी बॅंकांच्या बुडित कर्जाचे प्रमाण 4 लाख कोटी रूपये इतके होते ते मोदी सरकारच्या काळात साडे दहा लाख कोटींवर गेले असले तरी त्याला राजन यांनी घेतलेली धोरणेच कारणीभूत होती असे त्यांचे म्हणणे आहे. बुडीत कर्जांचे प्रमाण वाढल्यामुळे बॅंकांनी कर्जवितरण बंद केले त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम झाला असे ते म्हणाले.

देशाच्या सध्याच्या खराब अर्थव्यवस्थेचा ठपका रघुराम राजन यांच्यावर ठेवण्यात आल्याचा हा पहिलाच प्रकार आहे. देशाच्या नीति आयोगाच्या उपाध्यक्षांकडूनच तसा आरोप झाल्याने त्याविषयी आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)