“नीट’ची परीक्षा वर्षातून एकदाच होणार

वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याची विचार सोडला

नवी दिल्ली – वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची “नीट’ प्रवेशपरीक्षा वर्षातून दोनदा “ऑनलाईन’ पद्धतीने घेण्याचा विचार केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सोडून दिला आहे. आरोग्य मंत्रालयाने केलेल्या शिफारसीनुसार ही परीक्षा वर्षातून एकदाच घेण्यात येईल, असे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नव्याने सुरू करण्यात आलेल्या “नॅशनल टेस्टिंग एजन्सी’च्या माध्यमातून वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची “नीट’ आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी “जेईई- मेन’ या प्रवेशपरीक्षा वर्षातून दोन वेळेस घेण्यात येतील, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते. “एनटीए’च्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा संगणक आधारीत असतील, असेही त्यांनी सांगितले होते.

मात्र वर्षातून दोन वेळेस “नीट’परीक्षा घेण्याने विद्यार्थ्यांवर परीक्षांचा अतिरिक्‍त ताण पडेल, ही शंका आरोग्य मंत्रालयाने मांडली. परीक्षा “ऑनलाईन’ घेतल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसेल, अशीही भीती व्यक्‍त केली गेली. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे प्रश्‍नपत्रिकांच्या स्वरुपात, वर्षातून एकदाच “नीट’ परीक्षा घेतली जाणार आहे.

या बदलामुळे “नीट’ परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यापुढील परीक्षा 5 मे 2019 रोजी घेतली जाईल, असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)