निसान ‘सनी’ कारच्या किंमतीत तब्बल 2 लाखांची कपात

मुंबई: जपानी कंपनी निसानने आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. कंपनीने आपलल्या सनी कारच्या किंमतीत तब्बल 1.99 लाखांची कपात केली आहे. म्हणजे जवळजवळ दोन लाखांनी ही कार स्वस्त झाली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल व्हर्जनच्या बेसिक मॉडेलमध्ये 1.01 लाख रुपयांची सूट देण्यात आली असून आता ही कार 6.99 लाखांना खरेदी करता येणार आहे. तर याच कॅटेगरीत सर्वात ऍडव्हान्स व्हर्जनच्या किंमतीत 1.99 लाख रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे ही कार 8.99 लाख रुपये किंमतीला खरेदी करता येणार आहे. डिझेल कारमधील बेसिक मॉडेलच्या किंमतीत 1.31 लाख रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आता ही कार 7.49 लाख रुपयात खरेदी करता येणार आहे. तर याच्या टॉप मॉडेलमध्ये 94000 रुपयांची सूट देण्यात येणार आहे. त्यामुळे ही कार 8.99 लाख रुपयांना खरेदी करता येणार आहे. निसाननं मोठ्या प्रमाणात कारच्या किंमतीत कपात केली असली तरी आता ग्राहक या कारला पसंती देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)