निसर्ग शिक्षणावर शिक्षक, संवर्धकांची कार्यशाळा

पिंपरी – जागतिक वसुंधरा दिन निमित्त अलाईव्ह संस्थेद्वारा निसर्ग शिक्षक, संवर्धकांसाठी एन्थु नेचर 10 फन वे ऑफ नेचर एज्युकेशन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेत बहिणाबाई प्राणीसंग्रहालयाचे संचालक दीपक सावंत, शिक्षण अधिकारी भाग्यश्री मोरे, निवेदिता तिडके-सावंत, जिप्सि क्‍लबचे निनाद थत्ते, परिक्षित सूर्यवंशी, मेळघाट मित्र प्रशांत पिंपळनेरकर यांनी सहभाग घेतला.
अध्यक्ष उमेश वाघेला म्हणाले, निसर्ग संवर्धनाची चळवळ उभी करण्यासाठी निसर्गाच्या वेगवेगळ्या घटकांबाबत जनजागृती व शिक्षण करणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यासाठी प्रथम निसर्ग शिक्षकांना प्रशिक्षित करणे महत्वाचे आहे. त्यामुळे ते अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांसह पालकांचे आणि जनसामान्यांचेही प्रबोधन करू शकतील. हेच या कार्यशाळेचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

-Ads-

निसर्ग शिक्षक पियुष सेकसारिया यांनी विविध निसर्ग खेळ व प्रश्न मंजुषा कशा घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले. एक संघ भावना निर्माण करणारी इन्सेक्‍ट जिगसॉ, बिबट्याचे अनेक पैलू उलगडणारी लिओपार्ड क्विझ, चित्र व नावाद्वारे उत्सुकता जागवणारा जंगल डॉमिनोज, वन्यजीवांची विविध माहिती उलगडणारा ज्ञानवर्धक वाईल्ड लाईफ बिंगो, टायगर आणि लेपर्ड क्राफ्ट, वाईल्ड लाईफ ट्रम्प गेम्स अशा विविध खेळांव्दारे निसर्ग शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)