निसर्गातील प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान दडलेले

रविंद्र वाघोले : सबनीस विद्यालयात 90 प्रकल्प

नारायणगाव- निसर्गातील प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान दडलेले आहे. प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव विद्यार्थ्यांनी समजून घ्यावा, तसेच विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर जीवन सुखकर करण्यासाठी करावा, असे मत ग्रामोन्नत्ती मंडळाच्या गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिराचे मुख्याध्यापक रविंद्र वाघोले यांनी व्यक्‍त केले.
ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिरातील विज्ञान प्रदर्शनात 90 प्रकल्प, तर 200 विद्यार्थी सहभागी झाले होते. शालेय पातळीवरील विज्ञान प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी वाघोले बोलत होते. याप्रसंगी उपमुख्याध्यापक रमेश घोलप, विज्ञान विभाग प्रमुख रतिलाल बाबेल, भगवान सासवडकर, दादासाहेब शिंदे, बाबासाहेब वळकुंदे, सविता ताजणे, संचिता कवडे, रागिणी डेरे, मारुती कोल्हे, रघुनाथ पवार, बबुशा खरात आदी उपस्थित होते.
या प्रदर्शनाचे परीक्षण प्रा. नितीन पोखरकर, प्रा. रोहित भागवत, प्रा. नलिनी देशमुख यांनी केले. इ. 5 ते 7 वी या गटात धुमाळ ऋतुजा हिच्या “निर्माल्यापासून धूप’, इयत्ता 8 ते 10 वी या गटात कुमकर धनराज, ज्ञानेश टेमगिरे, भावेश डेरे, कृष्णा खराडे यांच्या “सांडपाणी पुनर्वापर’ या प्रकल्पास तसेच इ. 11 व 12 वी या गटात अर्थेश तोडकर, संदेश भोर, कौस्तुभ जाधव, ओम पोखरकर यांच्या “भाजीपाला व्यवस्थापन’ या प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान विभाग प्रमुख रतिलाल बाबेल, सूत्रसंचालन सविता ताजणे यांनी केले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)