निसर्गाची कॉपी करता आली पाहिजे

शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे नगरी

सातारा – सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावरील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे नगरीत ग्रंथमोहत्सवाच्या पहिल्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात ढासळते पर्यावरण आणि युवकांसमोरील आव्हाने या मुलाखतीच्या कार्यक्रमात माजी संचालक युनेस्को पॅरीस, राजेंद्र शेडें यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, निसर्गामध्ये जे काही घडतेय ते जाणून घेतले पाहिजे आणि निसर्गाकडून कॉपी करायला शिकले पाहिजे. बायोमिमिक्री नावाचे सायन्स तयार होत आहे. आपण मंगळावर, चंद्रावर स्वारी केली, समुद्राच्या तळापर्यंत पोहचलो, परंतु आपल्या आजूबाजूच्या निसर्गावर पुरेसे संशोधन अद्यापक केले नाही.

संपुर्ण झाडांच्या जाती पैकी फक्त 10 टक्के जाती आपल्याला माहिती आहेत. संपुर्ण जे प्राणी आहेत त्यापैकी फक्त 5 टक्के आपल्याला माहिती आहेत बाकींच्याचा आपण आजही उलघडा केला नाही. रानवाटा संस्थेच्या डॉ. संदीप श्रोत्री यांनी मुलाखतीद्वारे पर्यावराणाच्या होणाऱ्या ऱ्हासाची व त्याबाबच्या उपायोजनांची माहिती मुलाखतीतून यावेळी उलघडली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा डॉ. कैलास शिंदे, पर्यावरण अभ्यासक, संस्थापक संपादक भवताल, अभिजीत घोरपडे, संस्थापक जिवितनदी, पुणे. अदिती देवधर, शिरीष चिटणीस उपस्थित होते. कार्यक्रमात राजेंद्र शेडे म्हणाले, विमान ही पक्षांची कॉपी आहे,

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जहाज ही डॉल्फिनची कॉपी आहे. मुंग्याच्या वारूळामध्ये एअर कंडिशनची जरूरी नाही. विद्यार्थ्यांनो मुंग्याच्या वारूळाबाबत तुम्ही संशोधन करा. त्यात थर्मामिटर टाका संपूर्ण वर्षभर त्याचे तापमान समसमान व सुखावह असल्याचे तुम्हाला समजेल. मुंग्या त्यांच्या वारूळात एअर कंडिशन व फॅन वापरत नाहीत. पण मुंग्याला माहित असते कोणती माती वापरून वारूंळ बांधायचे असते. जोपर्यंत तुम्ही निसर्गाचे निरिक्षण करत नाही जोपर्यंत त्याची कॉपी करत नाही तोपर्यंत तुम्हाला आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल काही कळणार नाही असे ते म्हणाले.

साताराच्या जैवविविधता याबद्दल तुमचे मत काय? या प्रश्‍नाचे उत्तर देताना राजेंद्र शेंडे म्हणाले, सातारामध्ये अनेक प्रकारची जैवविवधता आहे, त्यामध्ये विविध प्राणी, वनस्पती आहेत, कासला जागतिक वारसा स्थळ मिळाले हे त्याचे एक कारण आहे. माणमध्ये असलेला विंचू जगभरात दुसरीकडे पाहायला मिळत नाही.

जलप्रदूषणाच्या समस्यांची सोडवणूक करताना काय केले पाहिजे हे सांगताना राजेंद्र शेढे म्हणाले, गाव तिथे ओढा या संकल्पनेचा अवलंब केला पाहिजे. प्रामुख्याने नदीमध्ये जाणारे पाणी हे ओढ्यातून जाते व नंतर ते समुद्राला मिळते. प्रथमत: नद्या स्वच्छ करण्यापेक्षा आधी ओढे स्वच्छ करणे आवश्‍यक आहे. यासाठी शाळा, महाविद्यालये, व प्रशासनाने काम केल्यास नद्यामधील पाणी प्रदुषण कमी होण्यास हातभार लागेल असेही राजेंद्र शेडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले.

एअर कंडिशनर व रेफ्रिजरेशन मुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत असते. ग्लोबल वॉर्मिंगकचा परिणाम होतो. एअर कंडीशन रेफ्रिजरेटरमधील सीएफसी वायुच्या बदलात दुसरा वायु आणला जो ओझोन वायूला आपाय करत नाही. हा चांगला बदल युनेस्कोने केला त्या प्रकल्पाचा मी प्रमुख होतो. मागच्या पिढीने घातक वायु वापरले त्यामुळे पर्यावरणाचा नाश झाला. पण नव्या पिढीने कल्पकते चांगला गॅस वायु तयार केला आणि तंत्रज्ञान वापरले व त्याचा पर्यावरणाला फायदा तयार झाला.

अब्दूल कलांमाच्या भेटीबाबत आठवण सांगताना शेडें म्हणाले, लसीकरण ठेवणाऱ्या पेटीचे तापमान 8 पेक्षा कमी व 10 पेक्षा जास्त झाले तर ती लस परिणाम कारक होत नाही. त्यासाठी मी युनायटेड नेशनमध्ये असताना एक फ्रिज तयार केला. व त्याचे प्रात्यक्षिक माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या समोर केले. त्यांनी तो माझ्याकडून पैसे देवून विकत ही घेतल्याची आठवण विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितली.

यावेळी जिवितनदीच्या संस्थापक, अदिती देवधर यांनी विद्यार्थ्यांना जलप्रदुषण रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. त्याबद्दल माहिती दिली. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी येत्या वर्षभरात घनकचरा व्यवस्थापण व सांडपाणी व्यवस्थापणासाठी शाळा महाविद्यालये तसेच सामाजिक संस्था, यांच्या माध्यमातून या विषयी भरीव काम करणार असल्याचे आश्‍वासन देखील दिले. त्यासाठी विविध स्पर्धाच्या माध्यमातून जनजागृती करणार असल्याचे उपस्थितांना सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार निकम यांनी तर आभार शिरीष चिटणीस यांनी मानले. या वेळी शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)